Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

परराज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची कोरोना चाचणी; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी सतर्क

रेल्वे मधून उतरताच पहिले होते अँटीजन टेस्ट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क : कोरोना च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा केडीएमसी प्रशासन देखील सतर्क झाला आहे परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकातच अँटिजेंन टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर ज्यांचे रिपोर्ट हे पॉझिटिव येत आहेत अशांना तातडीने सेंटरमध्ये दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेता प्रशासनाने आता चांगलीच कंबर कसली आहे. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकाचा अँटिजंन्ट टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. प्रवासी रेल्वे मधून उतरताना त्याचे आधार कार्ड हे प्रशासन ताब्यात घेत असून त्यांचे रिपोर्ट हाती लागल्यानंतरच त्यांची सुटका केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच ज्यांचे रिपोर्ट पॉजिटिव येत आहेत अशा रुग्णांना तातडीने सेंटरमध्ये हलवण्यास सुरुवात करण्यात येत आहे. यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासन सोबत जीआरपी, टीडी टीम, आरपीएफ टीम देखील दाखल आहेत.

त्यामुळे कोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तिसरा लाटेला रोखण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात सध्या प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

घरातच कोंडून ११ बाल कामगारांकडून घेत होते काम; बाल संरक्षण कक्षाने केली बालकांची सुटका

….या चित्रपटात कॉमेडी किंग ‘भाऊ कदम’ दिसणार खलनायकच्या भूमिकेत

…या गावात मादी बिबटयासह तिच्या पिल्यांचे वावर; वनविभागाने दिला सतर्कतेचा ईशारा

 

Comments are closed.