Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची गरज : राजु झोडे

चंद्रपूर, बल्लारपूर, घुगुस, वरोरा, राजुरा येथील हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर वाढती गुन्हेगारी थांबवण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपुर, दि. २७ जुलै : गेल्या वर्षभरापासून राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, घुगुस अशा जिल्ह्यातील मोठ्या शहरात दिवसाढवळ्या हत्याकांड घडलेले आहेत. गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून गुंड प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत.

तलवारी, देसी कट्टे, बंदूक, गुप्त्या, व तीव्र हत्यारे हातात घेऊन गुंड दहशत माजवत आहेत. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक उरलेला नसून पोलीस प्रशासनालाच आव्हान देत सदर गुंड दिवसाढवळ्या हत्याकांड घडवून आणत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या वाढत्या गुन्हेगारीच्या संबंधाने जिल्ह्यातील जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची समीक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे. गुन्हेगारांना ठेचून काढण्यासाठी निष्क्रिय पोलीस निरीक्षकांना कान पिचक्या देणे आवश्यक आहे.

त्याकरीता संवेदनशील गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या परिसरात शोध मोहीम राबवून त्यांच्याजवळील शस्त्रांची जप्ती करण्यात यावी. जिल्ह्यातील बदमाशी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर नजर ठेवून नियोजनबद्ध गुंडगिरीवर प्रतिबंध आणावा जर तडीपार गुंड जिल्ह्यात आढळून आल्यास संबंधित पोलीस निरीक्षकांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे, जयदिप खोब्रागडे, गुरु कामटे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वरील मागण्यांची तात्काळ दखल घेऊन गुन्हेगारांवर आळा घालावा व गुन्हेगारी जिल्ह्यातून हद्दपार करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी वाढत्या गुन्हेगारी विरोधात संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करणार असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.

हे देखील वाचा :

देसाईगंज शहरात समाजवादी पक्षाचा वाढता प्रभाव बघता शेकडो नागरिकांचा पक्षात प्रवेश

मोठी बातमी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ९९ वर्षांनी नाशिकचा सुपुत्र झाला बॅरिस्टर

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.