Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू…

वडसा वनविभागातील पोर्ला परिक्षेत्रातील काटली गावाच्या तलावाजवळील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली,  दि. ६ जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यातील  वडसा वनविभागाअंतर्गत येत असलेल्या पोर्ला परिक्षेत्रातील काटली गावाच्या तलावाजवळ वाघाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. ५ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.  प्राथमिक तपासणीवरुन सदर वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी तसेच मानद वन्यजीव रक्षक गडचिरोली मिलींद उमरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व NTCA चे प्रतिनिधी तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा (SOP) अनुसार घटनास्थळाच्या आजुबाजूस ५०० मीटर परिसरातील संपूर्ण क्षेत्र पुरावा शोधण्याकरीता तपासून पाहण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी आठ वाजता मृत वाघाच्या घटनास्थळी पंचनामा नोंदवून मृत वाघ पोर्ला वन परिक्षेत्र कार्यालय परिसरात आणून उपवनसंरक्षक वडसा विभागीय वन अधिकारी (दक्षता), गडचिरोली वनवृत्त सहाय्यक वनसंरक्षक वडसा, वनपरिक्षेत्र अधिकारी पोर्ला, मानद वन्यजीव रक्षक गडचिरेाली यांचे उपस्थितीत पशु वैद्यकीय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ.व्ही. एस.लेखामी पशु वैद्यकीय अधिकारी, गडचिरोली व पशु वैद्यकीय अधिकारी पोर्ला डॉ. बी.आर. रामटेके यांच्या चमुने मृत वाघाचे शवविच्छेदन करतांना मृत वाघांच्या मानेवर व पायाला झुंजीतील दुसऱ्या वाघाच्या चाव्यांच्या  जखमा दिसून आल्या तसेच मृत वाघाचे वय ३ ते ४ वर्ष असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया पार पदल्यानंतर मृत वाघाला दहन करण्यात आले. अशी माहिती उपवनसंरक्षक वडसा वनविभाग वडसा यांनी दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

व्याघ्र संरक्षणात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील महाविद्यालयासंदर्भात मोठा निर्णय, सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.