Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील महाविद्यालयासंदर्भात मोठा निर्णय, सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत याबाबत दिली माहिती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, जानेवारी :  कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (facebook live) विद्यार्थ्यांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेज १५ जानेवारीपर्यंत बंद राहतील, अशी घोषणा केली आहे.

उदय सामंत म्हणाले, राज्यातील फक्त अकृषी विद्यापीठ नाही तर इतर खासगी विद्यापीठांना सुद्धा हा निर्णय लागू राहणार आहे. सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय  काल मान्य केला आहे. परीक्षांमध्ये अडचणी येत असतील तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन नंबर देण्याचा सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयासोबत वस्तीगृहदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  जे विद्यार्थी परदेशातून व इतर राज्यातून संशोधन करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

परीक्षा ऑनलाईनच घ्याव्यात

उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील ऑनलाईन घेण्यात याव्यात, अशीदेखील सूचना केली आहे. “फक्त कोंडवाला, जळगाव आणि नांदेड अशा विद्यापीठ अशा काही ठिकाणी कनेक्टिवीटीचा प्रोब्लेम आहे. तो तुरळक प्रोब्लेम आहे. पण अशा ठिकाणी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्या परीक्षा ऑफलाईन कशापद्धतीने घेता येतील या संदर्भात कुलगुरुंनी चर्चा केली पाहिजे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या पाहिजेत. पण बाकीच्या सगळ्या विद्यापीठांनी परीक्षा ऑनलाईन घेण्याचं मान्य केलेलं असल्यामुळे तो देखील निर्णय आज आम्ही जाहीर करतोय”, असं उदय सामंत म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या असंख्या अडचणी, आणि शंकांचं निरसन करण्यासाठी प्रत्येक हेल्पलाईन उघडली पाहिजे. विद्यापीठाने देखील हेल्पलाईन उघडली पाहिजे, अशी सूचना आम्ही करतोय. परीक्षा व्यवस्थित पार पडण्यासाठी परीक्षेचं अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच इत्यादी माहिती उपलब्ध करुन द्यायची आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचंदेखील निरसन व्हायला पाहिजे”, असं उदय सामंत म्हणाले.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्कसाठी चित्रकला स्पर्धा ऑनलाईन घेणार

“शालेय शिक्षणाच्या काही परीक्षा उच्च व शिक्षण विभाग घेतं. त्यामध्ये दहावीच्या अगोदरच्या चित्रकला परीक्षा असतात. त्या परीक्षा पास झाल्यानंतर ग्रेस मार्क मिळतात. त्या परीक्षांबाबतही शंका निर्माण केली जात होती. पण या परीक्षादेखील फेब्रुवारीच्या अगोदर झाल्या पाहिजेत जेणेकरुन दहावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्कसाठी कुठेही अडचण येता कामा नये. ते ग्रेसमार्क मिळाले नाही म्हणून आपण कुठे कमी पडलो, अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात येऊ नये या परीक्षा घेतल्या जात आहेत”, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

लसीकरणावर भर देण्याची सूचना

“विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नसेल तर त्याचा डेटा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच लसीकरणासाठी कॅप्मचं आयोजन केलं जावं. पॉलिटेक्निकमध्ये १५ ते १८ अशा वयोगटातील विद्यार्थी असल्याने त्यांचं लसीकरण झालंय की नाही याबाबत प्रचार्यांनी चौकशी करावी. त्यानंतर कॅम्प लावून त्यांचं लसीकरण केलं जावं”, असं देखील उदय सामंत म्हणाले.

हे देखील वाचा : 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना व सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ – धनंजय मुंडे

व्याघ्र संरक्षणात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

 

Comments are closed.