Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस नक्षल चकमकीत एक नक्षली जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गोंदिया, दि. १३ मार्च :  देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मगरडोह पोलीस दूर संचार केंद्राच्या पोलीस पार्टी आणि नक्षल वाद्यां मध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत एक संशयित नक्षलवाद्याला गोळी लागल्याने तो जखमी झाला असून त्या नक्षलवाद्याला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेत प्रथम उपचार करत पुढील उपचारा साठी हेलीकॅपटर च्या माध्यमातून नागपूरला हलविले आले आहे.

गोंदिया जिल्याच्या देवरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चीचगड पोलिस स्टेशन अंतर्गत शस्त्र दूरसंचार केंद्र मगरडोहची पोलीस पार्टी राणीडोहच्या जंगलात शनिवारी सकाळी पेट्रोलींग करीत असताना अज्ञात नक्षलवाद्यांना कडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. याच हल्याया पोलिसांकडून प्रतिउत्तर देताना एका संशयित नक्षल वाद्याला गोळी लागल्यावर जखमी झाला असून जखमी नक्षल निळकंठ मडावी (५२) असे नाव आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर या चकमकी इतर नक्षली त्याला सोडून पडून गेले असता पोलिसांनी या जखमी नक्षलवाद्याला ताब्यात घेत प्राथमिक उपचारासाठी देवरी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती चिंता जनक होत असल्याने त्याला हॅलीकॅपटर च्या माध्यमातून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र हा संशयित नक्षली कुठल्या पार्टीचा आहे. याची अद्यापही ओळख पटू शकली नसली तरी देवरी पोलिसांच्या वतीने संध्याकाळ पर्यंत देखील जंगल भागात सर्च ऑपरेशन राबविण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

२०२२-२३ राज्याच्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.