Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जुगार अड्डा उद्वस्त करण्यात व खंडणी बहाद्दरांना रंगेहाथ पकडण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 15 मार्च : सिरोंचा ते असरअल्ली रोड दरम्यान मौजा रंगधाम पेठा चेक गावाजवळील एमएसईबी कार्यालयाच्या पाठीमागील शेतशिवारातील घरात अवैधरित्या जुगार अड्डा खेळला जातो अशा मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे यांचे नेतृत्वाखाली सपोनि जाधव, सपोनि बोंडसे यांनी दिनांक 12 मार्च 2022 रोजी घटनास्थळाचा शोध घेवुन आरोपीवर कारवाई करुन जुगार अड्डा उद्वस्त केला.

यात घटनास्थळावरुन 84,000 रू. रोख, 3 चारचाकी, 01 दुचाकी, 05 मोबाईल व इतर साहित्यासह एकुण 24,19,720/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन आरोपी नामे राजु सैलु तराला (३७ य 37 वर्ष रा. कलेक्टर ऑफिसजवळ, सुभेदार वार्ड पोस्ट जिल्हा हनमा कोंडा राज्य तेलंगाना 2) सुरेश कुमार पेदन्ना श्रीराम वय 52 वर्ष रा. वेनुराव कॉलनी (श्रीलक्ष्मी शिक्षीकेचे घरी) जिल्हा वरंगल राज्य तेलंगाना 3) रमन्ना कृष्णा रेड्डी थाडा वय 50 वर्ष रा. ज्योतीनगर जिल्हा करीमनगर राज्य तेलंगाना 4) मल्लेश ओदेलु मेकला वय 45 वर्ष रा. कॉलर माक्र्स कॉलनी, पोस्ट भोपालपल्ली जिल्हा जयशंकर राज्य तेलंगाना 5) रामचंदर बथुकैया वेमुला वय 52 वर्ष रा. गारेपल्ली जि. जयशंकर भुपालपल्ली राज्य तेलंगाना 6) धनंजय समय्या अकुबाडी वय 24 वर्ष रा. दुब्बागुडम ता. सिरोंचा जि. गडचिरोली 7) रामक्रिष्णा समय्या सोदारी वय 20 वर्ष रा. सिरोंचा जि. गडचिरोली अशा 07 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील तीन आरोपी नामे 1) क्रिष्णाय वेमुला अंदाजे वय 30 वर्ष रा. गोदावरी खणी जि. पेदापल्ली राज्य तेलंगाना 2) थालारी रवीसागर अंदाजे वय 25 वर्ष रा. जानमपल्ली ता. सिरोंचा जि. गडचिरोली हे फरार आहेत. सदर आरोपीवर पोस्टे असरअल्ली येथे अप. क्र.10/2022 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच मौजा गुड्डीगुडम येथील व्ही एम मतेरे इंडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे ऑफीसमध्ये जाऊन 25 लाख रु. खंडणी जिमेला नाल्याजवळील पुलावर आणुन देण्याबाबतची मागणी हिरवे ड्रेस घातलेले 3 ते 4 बंदुकधारी इसमांनी केली होती. मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार गडचिरोली पोलीस दलाच्या गोपनिय पथकाने दिनांक 12/03/2022 रोजी जिमेला नाल्याचे पुलाजवळ जावुन सापळा रचला. दरम्यान आरोपी नामे 1) मल्लेश मारय्या आऊलवार वय 24 वर्ष रा. राजाराम (खां.) ता. अहेरी जि. गडचिरोली 2) श्रीकांत सोमा सिडाम वय 20 वर्ष रा. चेरपल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली हे सदर जिमेला नाल्याच्या पुलाजवळ थांबुन होते. गोपनिय पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी साध्या वेषात पुलाजवळ गेले असता तुम्ही कोण आहात ? असे आरोपीनी विचारले, त्यावर अंमलदारांनी आम्ही रोडचे कामावरील मॅनेजर आहोत असे सांगताच हिरवे गणवेशधारी इसमांनी ठरविल्याप्रमाणे 25 लाख रु. खंडणीची मागणी केली. यावरुन गोपनिय पथकाने सदर आरोपींना ताब्यात घेतले व पोस्टे अहेरी येथे आरोपीविरुध्द अप.क्र. 01/2022 भादंवि कलम 387 व कलम 34 अन्वये गुन्हा नोंद केला असुन सदर दोन्ही आरोपीना दिनांक 17/03/2022 रोजी पर्यंत. मा. न्यायालयाकडुन पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे. यातील इतर आरोपी फरार असुन, सदर दोन्ही घटनेतील कारवाया एकाच दिवशी झाल्याने अवैध धंदे करणा­या आरोपींचे धाबे दणाणले आहे. वरील दोन्ही घटनेचा तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

वरील दोन्ही कारवाया मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल,  अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, आज दिनांक 12 मार्च 2022 रोजी दोन वेगवेगळया घटनेत जुगार अड्डा उद्वस्त करण्यात तसेच अवैध खंडणी वसुली करणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. सदरची कारवाई करणाऱ्या पथकांचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

गरिबांच्या हक्काच्या घरकुलाचा मार्ग प्रशस्त करा – खास. अशोक नेते

खान पट्ट्यात काम करणा-या मजुरांच्या आरोग्यासंदर्भात जागरूकता कार्यक्रम

 

 

Comments are closed.