Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारूबंदीसाठी महिलांची वरोरा पोलिस स्टेशन वर धडक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वरोरा, दि. १५ मार्च: तालुक्यातील उखर्डा येथील महिलांनी गावातील दारू बंद करण्यात यावी यासाठी पोलीस स्टेशन वर धडक देत दारू विक्रेत्याच्या मोरक्या आवडाव्या अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे.

उखर्डा गावात गेल्या वर्षभरापासून सर्रास अवैध दारू विक्री सुरू आहे. अवैधरीत्या दारू विकल्या जाणाऱ्या दारू तस्करांना अटक करण्यासाठी तक्रारही दिली मात्र त्याचा काही परिणाम झाला नसल्याने शेवटी आज महिलांनी तक्रार दिली. एवढंच नव्हे तर पोलिसांच्या आशीर्वादाने दारूची विक्री सर्रासपने सुरू आहे. पोलिसांना दारू तस्कर सापडूनही पोलीस त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप येथील महिलांनी केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आदर्श गाव म्हणून पुरस्कार प्राप्त असलेलेल्या गावाचे नाव महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या कार्याने व गुरुदेव सेवा मंडळ ने नेले त्याचं गावात दारू विक्री सुरू आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी येथील महिलांनी दिल्या आहे. 

दारू विक्रेत्यांच्या भीतीने कुणीही पुढाकार घ्यायला तयार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

येथील ग्राम पंचायतदेखील फक्तं बघ्याची भूमिका घेत असते. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी दारूबंदी करण्याच्या प्रयत्न केला तरीदेखील दारू विक्रेत्याला पोलिसांचा आशीर्वाद असल्याने अजुनही  दारूविक्री सर्रासपणे सुरू आहे. यामुळे गावातील महिलांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो आहे. गावातील महिलांना शिवीगाळ केली जाते व तक्रार करणाऱ्यास धमकी देण्यात येतात. गावात भीतीचे वातावरण पसरले असून गावातील नागरिक संतप्त झाले आहे.

पोलीस विभाग घेत आहे बघ्याची भूमिका.

सकाळी उठून चहा चे आधीं लोकं दारू पिऊन गावात धिंगाणा, भांडण, झगडे, हाणामारी करीत असतात तसेच महिलांनाही या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. मात्र पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून पोलीस विभाग बघ्याची भूमिका घेत आहे.

हे देखील वाचा : 

खान पट्ट्यात काम करणा-या मजुरांच्या आरोग्यासंदर्भात जागरूकता कार्यक्रम

गरिबांच्या हक्काच्या घरकुलाचा मार्ग प्रशस्त करा – खास. अशोक नेते

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed.