Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

20 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १६ मार्च : टी.सी. ओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले असून 20 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल दाम्पत्यानी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

दिपक ऊर्फ मुन्शी रामसु ईष्टाम वय 34 वर्ष रा. गडेरी, पोमके कोटमी ता. एटापल्ली जि. गडचिरोली व शामबत्ती नेवरु आलाम वय 25 वर्ष रा. हिदवाडा पोस्टे ओरच्छा जि. नारायणपुर (छ.ग.) यांनी गडचिरोली चे पोलीस अधीक्षकअंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिपक ईष्टाम व शामबत्ती आलाम हे दोघे पती-पत्नी असून ते दोघेही प्लाटुन क्र. 21 मध्ये कार्यरत होते. दिपक ईष्टाम हा डीव्हिसी पदावर तर शामबत्ती आलाम ही प्लाटुन सदस्य म्हणुन कार्यरत होती. दिपक ईष्टाम याचेवर खूनाचे 03, चकमकीचे 08, जाळपोळ 02 असे गुन्हे दाखल असुन, माहे जुलै- 2001 मध्ये तो कसनसुर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. माहे ऑक्टोंबर 2001 ते नोव्हेंबर 2002 पर्यंत तो चामोर्शी दलम सदस्य पदावर कार्यरत होता.

त्यानंतर माहे-ऑक्टोंबर 2004 पर्यंत तो सीसीएम देवजी यांचे प्रोटेक्शन गार्डमध्ये कार्यरत होता. नंतर सन-2006 पर्यंत कंपनी क्र.1 मध्ये ए सेक्शनमध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता. त्यानंतर 2009 ते 2015 पर्यंत कंपनी क्र.1 ए प्लाटुन कमांडर पदावर व त्यानंतर सन 2015 ते आजपर्यंत प्लाटुन क्र. 21 मध्ये डीव्हीसी पदावर कार्यरत होता. नक्षलमध्ये कार्यरत असतांना त्याने विविध ठिकाणी 06 अॅम्बुश लावले होते. त्याने लावलेल्या अॅम्बुशमध्ये छत्तीसगडमधील कुदुरघाटी 04, झाराघाटी 02, कोंगोरा 25 असे एकुण 31 जवान शहीद झाले. पत्नी शामबत्ती हीचेवर चकमकीचे 02 असे गुन्हे दाखल असून, ती सन 2015 मध्ये 08 महीने जनमिलीशियामध्ये व त्यानंतर प्लाटुन क्र.16 मध्ये सदस्य पदावर भरती होवुन आजपर्यंत प्लाटुन क्र. 21 मध्ये कार्यरत होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शासनाने दिपक ईष्टाम याचेवर 16 लाख रूपयाचे तर शामबत्ती आलाम हिचेवर 04 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे पुनर्वसनाकरीता शासनाकडुन दिपक ईष्टाम यास 06 लाख रुपये व शामबत्ती आलाम हीला 2.5 लाख रुपये तसेच पती-पत्नीने एकत्रीत आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त 1.5 लाख असे एकुण 10 लाख रुपये तसेच शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळवुन देण्यात येणार आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन 2019 ते 2022 सालामध्ये आतापर्यंत एकुण 45 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये 5 डिव्हीसी, 02 दलम कमांडर, 03 उपकमांडर, 34 सदस्य व 01 जनमिलीशिया यांचा समावेश आहे. सदर नक्षलींचे आत्मसमर्पण घडवुन मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई गडचिरोली जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे ,अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे . यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाचे सपोनि बाबासाहेब दुधाळ यांनी पार पाडुन मोठी भुमिका बजावली आहे. टीसीओसी सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर 02 जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालींवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.

हे देखील वाचा : 

दारूबंदीसाठी महिलांची वरोरा पोलिस स्टेशन वर धडक

 

 

 

Comments are closed.