Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खनिज संपत्तीवर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यातच उभारा – खा. अशोक नेते यांची 377 अधीन सुचनेअंतर्गत लोकसभेत मागणी

सुरजागड लोह प्रकल्प चामोर्शी किंवा एटापल्ली येथे उभारण्याची मागणी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली,  दि. ३ मार्च : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर मोठ्या प्रमाणावर लोह खनिज असून त्याचे उत्खनन गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. उत्खनन केलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी सदर कच्चा माल बाहेर पाठविल्या जात आहे. त्यामुळे सुरजागड परिसरातील गावांमधील लोकांमध्ये शासनाप्रति प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

आदिवासी, दुर्गम भागातील जनतेची मागणी लक्षात घेता सुरजागड येथील कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली किंवा चामोर्शी तालुक्यात उभारून येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी ३७७ अधीन सुचनेनुसार लोकसभेत केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र हा महाराष्ट्रातील अतिमागास , आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त व अविकसित क्षेत्र आहे. या क्षेत्रात मैगनिज, लोहा, अभ्रक, हिरा इत्यादी खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जिल्ह्यात उद्योगधंदे व कारखाने नसल्याने येथील बेरोजगार युवक वणवण भटकत आहे. जिल्ह्यात उपलब्ध खनिज संपत्ती व वनोऔषधी वर आधारीत प्रकल्प,उद्योग निर्माण केल्यास क्षेत्रातील हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल व ते आर्थिक सक्षम होतील.

त्यामुळे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहाचे उत्खनन करून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व स्टील प्लान्ट गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी किंवा एटापल्ली तालुक्यात उभारण्यासाठी केंद्रशासनाने उचित निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी ३७७ अधीन सुचने नुसार लोकसभेत केली व जिल्ह्यातील या उद्योगाच्या महत्वाच्या प्रश्नांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

महिला डॉक्टरांची गुढी पाडाव्या निमित्त मोटरसाइकल रैली

डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून दुबईमध्ये झाला महाराष्ट्रातल्या ३३ जणांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.