Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी; वाघ बघायला जाणे बेतले जीवावर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. १५ एप्रिल : जिल्ह्यातिल तोहोगाव आर्वी जवड मुख्य रस्त्या लगत वाघ बसून असल्याची माहिती मिळताच वाघाला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. वाघाच्या अगदी जवळ जाऊन बघण्याचा प्रयत्न नागरिक करीत होते. अशातच एका नागरिकांने दगळ फेकून मारला आणी वाघाने लोकांवर हल्ला चडविला त्यात दोन जन गंभीर जखमी झाले.

शरद बोपनवार आणी सुरेश मत्ते वाघाच्या हल्ल्यात जख्मी झाले आहे.त्यांना उपचाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मागील आठवडाभरापासून धुमाकूळ घालणारा वाघ गावालगतच्या झुडपांत असल्याची माहिती मिळताच लोकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. वनपरिक्षेत्र गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव , आर्वी व वेजगाव परिसरात वाघाने धुमाकूळ सुरू केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाघाची तोहगाव, आर्वी व वेजगावा या तीन गांवामध्ये दहशत पसरली आहे. नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वन विभागाने तोहगाव, आर्वी व वेजगाव परिसरात वाघाचा संचार सुरु असल्याने तोहगाव – आर्वी मार्गालगत वाघ पकडण्यासाठी एक पिंजरा लावला आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

भीषण अपघात : कार अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू सहाजण गंभीर जखमी 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.