Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण दुर्घटना : मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळून 12 ठार

गुजरातमधील मोरबी येथे भीषण दुर्घटना; मोदी-शहांनी व्यक्त केलं दुःख, मदत जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वृत्तसंस्था, दि. १८ मे : गुजरातमधील मोरबी येथे भीषण दुर्घटना घडली आहे. हलवद जीआयडीसीमधील मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळून 12 मजुरांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अद्यापही काही मजूर भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हलवदच्या जीआयडीसीमध्ये सागर सॉल्ट कारखान्यात मिठाच्या गोण्या भरण्याचे काम सुरू होते. याचवेळी अचानक कारखान्याची भिंत कोसळली. ही घटना घडली तेव्हा अनेक मजूर कारखान्यामध्ये काम करत होते. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे मजुरांना सावरायलाही वेळ मिळाला नाही आणि अनेक मजूर भिंतीखाली दबले गेले. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. या ढिगाऱ्याखाली दबून अनेक मजुरांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मोरबी दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे. मोरबी येथे भिंत कोसळून घडलेली दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या कठिण काळामध्ये पीडितांच्या कुटुंबियाशी माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे होओत. स्थानिक प्रशासने सर्वोतोपरी मदत करत आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच पीएम मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना पीएम रिलीफ फंडातून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गृहमंत्र्यांचे ट्वीट

पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट केले असून मोरबी येथील दुर्घटनेमध्ये 12 जणांचा जीव गेला असून ही अत्यंत दु:खद घटना आहे. तसेच या घटनेबाबत आपण मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याशी संवाद साधला असून प्रशासन सर्वोतोपरी मदत करीत असल्याचे शहा यांनी म्हंटले आहे.

हे देखील वाचा : 

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राजीव गांधींच्या मारेकऱ्याची मुक्तता

पत्नीला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून पती स्वत: कोपऱ्यात उभं राहून पाहायचा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.