Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हमालाचा मुलगा बनला मर्चंट नेव्हीत ऑफिसर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

विशेष प्रतिनिधी  – के. सचिनकुमार 

वाशीम, दि. १८ मे :  अलीकडे चांगलं शिक्षण आणि नोकरीसाठी घरची आर्थिक परीस्थीती उत्तम असायला हवी असी ओरड असतानाच, दुसरीकडे मात्र वाशिम जिल्ह्यातील कांरजा मधील एका हमालाच्या मुलाने नेव्ही मर्चंन्टमध्ये इलेक्ट्रो टेक्नीकल ऑफिसर सारख्या महत्वाच्या पदाला गवसनी घालुन जिद्द, चिकाटी  मेहनतीला पर्याय नाही  हे नितेश जाधव ने दाखवुन दिलय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कांरजा येथील शिवाजी नगरात राहणाऱ्या नितेश चंद्रकांत जाधव याने नुकतीच इलेक्ट्रो टेक्नीकल ऑफिसर पदाची परीक्षा उत्तीर्ण केली असुन येत्या जुन महिण्यात तो त्या पदावर रूजु होणार आहे.  नितेशचे वडील चंद्रकांत जाधव हे कांरजा बाजार समितीत हमालीचे काम करीत असुन आई गृहिणी आहे.  त्यांच्या घरची आर्थिक परीस्थिती तशी बेताचीच. पण मुलांनी शिकून नोकरी करावी यासाठी त्यांची धडपड असते. नितेशने कांरजा येथिल न प शाळेतील प्राथमिक शिक्षणानंतर  बी ई इलेक्ट्रिकल ही पदवी संपादन केली आणि इतरांप्रमाणे शासकीय सेवेत नेाकरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटामुळे शासकिय सेवेत नेाकरी मिळणे कठीण असल्याचं त्याच्या लक्षात आल्यानं त्याने संप्टेबर 2021 मध्ये ही परीक्षा दिली आणि त्यात 81 टक्के गुण संपादन केले.

आता नेव्ही मर्चंन्टमधील या नेाकरीसाठी त्याला दोन लाख रूपये प्रतिमहिना वेतन मिळणार असुन जहाजावरील इलेक्ट्रिकची कामे त्याला करावी लागनार यासाठी त्याला कोणचेही मार्गदर्शन लाभले नसुन त्याने इंटरनेटलाच मार्गदर्शक मानुन शिक्षण ते नोकरी असा प्रवास पुर्ण केलाय. कांरजातील नितेश जाधवची जिद्द, चिकाटी व मेहनत प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकृत करुन शिक्षणाची वाट धरल्यास नोकरी मिळत नाही असे म्हणण्याची वेळ येणार नाही, हे नितेश ने सिद्ध करुन दाखविले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

भीषण दुर्घटना : मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळून 12 ठार

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राजीव गांधींच्या मारेकऱ्याची मुक्तता

पत्नीला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून पती स्वत: कोपऱ्यात उभं राहून पाहायचा

 

Comments are closed.