Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र – राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक 2022 निकाल जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. 11 जून : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी काल दिनांक 10 जून 2022 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून या राज्यसभा द्विवार्षिक निवडणूकीत 7 उमेदवारांपैकी 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहे.

विजयी उमेदवारांच्या निवडणूक क्रमवारीनुसार पीयूष वेदप्रकाश गोयल यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य, डॉ.अनिल सुखदेवराव बोंडे यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य मिळाले आहे. इम्रान प्रतापगढी यांना पहिल्या फेरीत 4400 मत मूल्य मिळाली आहे. प्रफ्फुल मनोहरभाई पटेल यांना पहिल्या फेरीत 4300 मत मूल्य मिळाली असून संजय राजाराम राऊत यांनाही पहिल्या फेरीत 4100 मत मूल्य मिळाली आहेत. तर धनंजय भीमराव महाडिक यांना तिसऱ्या फेरीत 4156 मत मूल्य मिळाली असून हे सर्व 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी केलेल्या मतदानात 284 वैध मते ठरली होती.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चुरशीच्या लढाईत भाजपच्या मुन्ना महाडिकांची शिवसेनेच्या संजय पवारांना धोबीपछाड, महाविकास आघाडीची मते फोडून भाजपने डाव साधला..

आजादी का अमृत महोत्सव निमित्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

वसई विरार महानगर पालिकेच्या निवडणुक रिंगणात श्रमजीवी संघटना पूर्ण ताकदिने उतरणार

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.