Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चुरशीच्या लढाईत भाजपच्या मुन्ना महाडिकांची शिवसेनेच्या संजय पवारांना धोबीपछाड, महाविकास आघाडीची मते फोडून भाजपने डाव साधला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • पियूष गोयल, अनिल बोंडे, संजय राऊत, प्रफुल पटेल आणि इमरान प्रतापगढी विजयी….
  • राज्यसभा निवडणुकीत मोठा घोडेबाजार..!

मुंबई डेस्क, दि. ११ जून :राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडल्यानंतर मतमोजणी दरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्या. या निवणुकीत महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार शिवसेनेचे संजय पवार यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला. तर, भाजपचे धनंजय महाडिक, पियूष गोयल, अनिल बोंडे, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे इमरान प्रतापगढी हे विजयी झाले आहेत. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवले. शिवाय महा विकास आघाडी सरकार सोबत असलेल्या आमदारांची मतं फोडण्यात भाजपला यश आले. त्यामुळेच भाजपच्या १०६ मतांशिवाय अधिकची १७ मतं मिळवण्यात भाजपला यश आलं. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याने महाविकास आघाडीची मते फोडून भाजपने डाव साधला हे स्पष्ट झाले आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी विधान भवनात मतदान प्रक्रिया सुरू असताना महाविकास आघाडीच्याजि तेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आरोप भाजपने केला.तर, रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने याप्रकरणी बैठक घेऊन शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले. तर जितेंद्र आव्हाड, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरवली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोणत्या उमेदवाराला किती मत मिळाली

पियुष गोयल (भाजप) – ४८ मतं

अनिल बोंडे (भाजप) – ४८ मतं

धनंजय महाडिक (भाजप) – ४१ मतं

इमरान प्रतापगढी (काँग्रेस) – ४४ मतं

प्रफुल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस) – ४३ मतं

संजय राऊत (शिव सेना) ४२ मतं

संजय पवार (शिव सेना) – ३३ मतं

संजय पवार यांना पहिल्या फेरीत ३३ मतं मिळाली होती. तर धनंजय महाडिक यांना पहिल्या फेरीत २७ मतं मिळाली होती. मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये महाडीकांना १४ मतं मिळाली, तर संजय पवार यांना एकही मत मिळाले नाही.

त्यामुळे महा विकास आघाडी बरोबर आलेल्या आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या १०६ मतांशिवाय त्यांना अधिकची मतं १७ मिळवण्यात यश आलं आहे.

Comments are closed.