Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यातील सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या लोकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत' महोत्सवाचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि.२८:- महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारा आंतरराज्य कार्यक्रम येत्या २९ ते ३१ जुलै २०२२ या कालावधी दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ओडिशा राज्यातील तीन कला समूह व महाराष्ट्रातील तीन कला समूह आपली साजरी करणे करणार आहेत. भक्ती संस्कृती शास्त्रीय संगीत व लोककला या तीन प्रकारातील लोकोत्सव आंतरराज्य महोत्सवास प्रेक्षकांना पहावयास मिळतील.

देशांमध्ये आंतरराज्यीय सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी आणि त्यातून एकात्मता जपली जावी यासाठी “एक भारत श्रेष्ठ भारत” हा उपक्रम देशभरात साजरा केला जातो. या उपक्रमांतर्गतच महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांची आंतरराज्य सांस्कृतिक देवाणघेवाण होण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जोडी निश्चित केलेली आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाचा एक भाग म्हणून ओडिशा व महाराष्ट्र राज्याची उच्च व समृद्ध संस्कृती दर्शविणाऱ्या लोकोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे शुक्रवार दिनांक २९ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे सायंकाळी ६ ते १० या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोककला, लोकपरारंपरा तसेच सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या लोकोत्सव या तीन दिवसीय महोत्सवाच्या माध्यमातून ओडिसा व महाराष्ट्र राज्यातील विविध नृत्य, संगीत, लोककला प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. महाराष्ट्र व ओडीसा राज्यांची लोकसंस्कृती, लोककला, प्रथा-परंपरा यामध्ये बरेच साम्य आहे. या राज्यांमधील संस्कृतीची ओळख व्हावी या उद्‌देशाने लोकोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.एक भारत श्रेष्ठ भारत या केंद्रशासनाच्या उपक्रमानुसार महाराष्ट्र राज्य व ओडीसा या दोन राज्याच्या लोककलाचा महोत्सव शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामुल्य अनुभवायला मिळणार आहे. लोकोत्सव या ३ दिवसीय कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र व ओडीसा राज्यांची समृदध अशी लोकपरंपरा, भक्तीपरंपरा व शास्त्रीय नृत्यांचे जोपासना करणाऱ्या कलापथकाचे सादरीकरण होणार आहे. लोकोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात दि. २९ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ओडीसी लोककलेचे प्रसिध्द कलाकार डॉ. मोहित कुमार स्वाईन आणि सहकलाकार यांची ओडिसा लोककला व शास्त्रीय नृत्यांच्या महाराष्ट्रातील प्रसिध्द नृत्यांगणा शुभदा वराडकर आणि संघ यांचे शास्त्रीय नृत्य सादर होणार आहे. दि. ३० जुलै २०२२रोजी ओडीसी भक्तीसंगीत, सादरकर्ते मनोज कुमार पांडा व सहकलाकार आणि संजिवनी भेलांडे आणि सहकलाकार,यांच्या भक्तीगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे. ३१ जुलै २०२२ रोजी राकेश शिर्के आणि सहकलाकार यांच्या महाराष्ट्रातील सर्वांग लोककला व ओडिसा येथील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य कळलाकार श्री. वसंतकुमार प्रदा आणि सहकलाकर आपली कला सादर करणार आहेत.

एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र आणि ओडीसा या आंतरराज्यातील लोकोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्व-रसिक प्रेक्षकांना विनामुल्य उपलब्ध असुन जास्तीत जास्त रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली रतन टाटांची भेट.

https://loksparsh.com/maharashtra/that-illegal-acne-extraction-of-seniors/27987/

धक्कादायक : वाघाच्या हल्ल्यात आणखी एक शेतकरी ठार…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.