Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण;  सुर्यापल्ली वासीयांचा नवा उपक्रम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुर्यापल्ली येथील मुख्याध्यापक प्रवीण टोंगे यांची कल्पना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • १० वी, १२ वीत गुणवत्तापूर्ण यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण.
  •  उपक्रमाची सुरुवात याच वर्षीपासून होणार.
  • यंदाच ध्वजारोहण अक्षता अत्राम हिच्या हस्ते होणार. 

अहेरी, दि. ११ ऑगस्ट : भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे, याच धर्तीवर सूर्यापल्ली वासियांनी गावात एक नवीन उपक्रम राबवण्याच ठरविले  आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यासाठी घेण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समिती, पालक व गावकरी यांच्या संयुक्त सभेत सुर्यापल्ली वासीयांनी गावातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे ते असे की, ईयत्ता १० वी व १२ वीत गुणवत्तापूर्ण यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.याकरिता शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी काही अटी ठेवल्या आहेत.

अटी काय आहेत ते पाहुयात

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • प्रथम म्हणजे सदर विद्यार्थी हे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुर्यापल्ली चे माजी विद्यार्थी असावे.
  • विद्यार्थ्यांनी इयत्ता १० किंवा १२ वीत किमान ८० टक्के गुण मिळवायला हवे. 

या संपूर्ण कल्पणेमागील उद्देश असा की, गावातील विद्यार्थ्यांच्या अंगी अभ्यासाची सवय लागावी, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची जिद्द व चिकाटीने प्रयत्न करण्याची सवय लागावी. त्याचप्रमाणे गावातील विद्यार्थी अभ्यास करून शासकीय सेवेत दाखल होऊन विद्यार्थ्यांनी देशसेवा करावी या निस्वार्थ उद्देशाने सदर निर्णय घेण्यात आला आहे.

या उपक्रमाची सुरुवात याच वर्षीपासून होणार असून प्रथम ध्वजारोहणाचा मान अक्षता संजय आत्राम हिने पटकावलाय. अक्षताने इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्यामुळे यंदा अक्षताच्या  हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

संबंधित सभेला शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष किशोर आलाम, सदस्य दिवाकर आलाम, मनोज सडमेक, भिमराव तलांडे, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान आलाम , माजी सरपंच बाबुराव आत्राम, मनोज आलाम, राजू आत्राम, महेंद्र सिडाम, सुखदेव आलाम, संजय आत्राम, दिपक आलाम, विलास करपेत , जिवेंद्र आत्राम हनमंतू सिडाम, अरुण कुमरमव इतर गावकरी तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रविण टोंगे व उमेश आलाम हे उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

किशोरी संजिवनी उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात चार तालुक्यात राबविणार – कुमार आशीर्वाद

 

17 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन.

Comments are closed.