Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोविड बुस्टर डोजमध्ये गडचिरोली राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.०२ सप्टेंबर : सर्व जग कोविड महामारीशी लढा देत असतांना कोविड लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराचा विळखा कमी करण्याकरीता प्रयत्न सुरु आहेत. अशाच प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेला अती दुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा कोविड बुस्टर डोजमध्ये राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कॉरबीवॅक्स कोविड बूस्टर डोज लसीकरणामध्ये गडचिरोली जिल्हयाने ११,१३८ लाभार्थांचे लसीकरण पूर्ण केले असून, हि कामगीरी उल्लेखनीय आहे. राज्यात कॉरबीवॅक्स लसीचे ७२,४९५ डोज लागलेले आहेत. त्यामध्ये गडचिरोली जिल्हयाचा वाटा १५.३६ टक्के आहे. तरी यापूढे सुध्दा नागरीकांचा लसीकरणामध्ये सहभाग अपेक्षित आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोविड सारख्या जागतीक महामारीत मृत्यूचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने कोविड लसीकरण अत्यंत महत्वाचे असून, १२ वर्षावरील सर्व पात्र नागरीकांनी कोविडचा पहिला, दुसरा व बुस्टर डोज जवळच्या प्रा.आ. केंद्रात जावून पूर्ण करून घ्यावा असे आवाहनही डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केले आहे.

ज्या नागरीकांचे पहिले २ डोज कोविड लसीकरण कोविडशिल्ड किंवा कोवॅक्सीन लसीद्वारे पूर्ण झालेले आहेत असे नागरीक या पूढे दुसऱ्या डोजच्या ६ महिन्यानंतर कॉरबीवॅक्स लसीचा बुस्टर डोज सूध्दा घेवू शकतात असे आवाहन डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

१८ वर्षावरील सर्व नागरीक कोविड लसीकरणाच्या बुस्टर डोजसाठी पात्र आहेत. आरोग्य विभागाकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की दुसरा डोज घेतल्यानंतर ६ महिन्यांनी लगेच कोविड लसीकरणाचा बुस्टर डोज लावून घ्यावा.

कुमार आशिर्वाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली

हे देखील वाचा: 

जिल्हा परिषद आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

 

 

Comments are closed.