Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुर येथे मानकापूर क्रीडा संकुलात गडचिरोली जिल्हयाची सैन्य भरती 19 सप्टेंबर रोजी

महाराष्ट्र परिवहन विभागातर्फे स्पेशल बस सेवेचा उमेदवारांनी लाभ घ्यावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 16 सप्टेंबर :- भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्हयांमध्ये यापुर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्हा निहाय निवड प्रक्रिया आता मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.

‘अग्निवीर,अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये गडचिरोली आणि वर्धा या जिल्हासाठी सैन्य भरती प्रक्रीया दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. गडचिरोली आणि वर्धा जिल्हयांमधून 3100 उमेदवारांची नोंदणी झाली आहे अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नागपूर, मेजर डॉ.शिल्पा खरपकर, यांनी दिली. नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरीक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रीडा संकुल हे योग्य स्थळ असून याच ठिकाणी ही प्रक्रीया पार पडली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा व अन्य् व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दिल्या. भरतीसाठी महाराष्ट्र परिवहन विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या स्पेशल बस सेवा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नागपूर यांनीही कळवले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.