Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नालासोपारा येथे प्रवासी बसला लागली आग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नालासोपारा, दि. ३० सप्टेंबर : नालासोपारा येथे वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली.

अग्नीशम विभागाने बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता नालासोपारा स्थानकातून वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेची बस (एमएच ४७ ६३२०) ही महामार्गावर जात होती. या बसमध्ये एकूण १५ प्रवासी होती.
बस नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग परिसरातून जात असातना अचानक इंजिन मधून ठिणग्या पडू लागल्या. बसचालक शिवम चव्हाण याने प्रसंगावधान दाखवून बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर जायला सांगितले. इतक्यात बसने पेट घेतला. मात्र तो पर्यंत प्रवासी बस मधून उतरल्याने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या आगीत बस पुर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली आहे. आग नेमकी कशामुळे लागली ते स्षष्ट झालेले नाही. आग आटोक्यात आणली आहे अशी माहिती पालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव यांनी दिली.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तंबाखूजन्य पदार्थ पुरवठादार व उत्पादकांवर कठोर कारवाई करा – मंत्री संजय राठोड

नैना – तीसरी मुंबई म्हणून ओळख मुंबईतील लोकांचा राहण्याचा दर्जा वाढविणार ….

 

Comments are closed.