Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तलाव रोडचे काम पूर्ण करा

आप ची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

देसाईगंज,18,ऑक्टोबर :- येथील नैनपुर, शास्त्री वार्डातील जवळपास 50 टक्के नागरीक तथा विद्यार्थी तलावाच्या पाळीने ये-जा करीत असतात. तसेच देसाईगंज येथील दुर्गा व गणपती विसर्जन देखील नैनपुर तलावात करण्यात येते. मात्र, तलावाच्या पाळीवरील रोडचे सिमेंट काॅंक्रीटचे काम पूर्ण झालेले नसल्यामुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एखाद वेळी मोठी दुर्घटना होवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या तलावावरील रोड चे काम पूर्ण करावे अशी मागणी आम आदमी पार्टी ने निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देते वेळी आपचे तालुका अध्यक्ष भरत दयलानी, शहर अध्यक्ष आशिष घुटके, शहर उपाध्यक्ष नवेद शेख, शहर सचिव तबरेज खान, महिला उपाध्यक्ष नुरजहा पठाण, तालुका सचिव दीपक नागदेवे, प्रमोद दहीवले, अतुल ठाकरे, नाजूक लुटे आदि उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

ब्रेकींग न्युज : आ.संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वर्षातून किमान तीन वेळा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Comments are closed.