Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिग बॉस’च्या घरात अमृता फडणवीसांची एंट्री !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई  27 ऑक्टोबर :-  यंदा मराठी ‘बिगबॉस सिझन ४’मध्ये अगदी पाहिल्या दिवसापासूनच तूतू-मैमै चालू झालेली दिसली. महेश मांजरेकरांनी त्यावर भाष्यही केले. काही सदस्यांना झापले देखील आहे. आता बिग बॉसच्या घरातही दिवाळसण साजरा होताना दिसतोय. दर्शकांना आज या दिवाळी सणात खास पाहुणी म्हणून अमृता फडणवीस यांची एंट्री होताना पाहायला मिळणार आहे !

अमृता फडणवीस यांनी दिली स्पर्धकांच्या प्रश्नांची उत्तरं

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर किरण माने यांनी विचारले, “तुम्हांला माहितीच असेल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनपद खूप महत्वाचं असतं, पण मला तुम्हांला विचारायचं आहे की, बिग बॉसच्या बाहेर महाराष्ट्र आहे, त्याचा कॅप्टन कोण आहे ?” त्यावर त्यांच्या नेहमीच्या शैलीत अमृता म्हणाल्या, “मी तुम्हांला दोन नावं सांगते, जे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत एक प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन. श्री. एकनाथराव शिंदेजी एक कॅप्टन आहेत आणि एक देवेंद्र फडणवीसजी आहेत.” या मजेदार गप्पांसोबतच अमृता फडणवीस सदस्यांसमोर गाणार तर आहेतच , शिवाय त्यांच्यासोबत नाचतानाही त्या दिसत आहेत. एकूणच आज ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी बिग बॉसने आगळया वेगळ्या मनोरंजनाची मेजवानी देऊ केली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.