Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

T 20 WC 2022- टीम इंडियाचा नेदरलँडवर मोठा विजय

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच विजयी अभियान कायम आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

T20 World Cup :-   टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाचा विजयी सिलसिला कायम आहे. सलामीच्या सामन्यात पाकिस्तान त्यानंतर आता नेदरलँड विरुद्ध विजय मिळवला. वर्ल्ड कप टुर्नामेंटमधला टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने विजयाची पायाभरणी केली. त्यानंतर गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं.

रोहित शर्माने  टॉस जिंकल्यानंतर खेळपट्टी पाहून फलंदाजी स्वीकारली. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 179 धावा फटाकवल्या. टीम इंडियाच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँडने 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 123 धावा केल्या. टीम इंडियाने हा सामना 56 धावांनी जिंकला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.