Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यांनी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यासह सहा वनकर्मचाऱ्याला मारहाण करीत दुचाकीची केली जाळपोळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ६ जानेवारी : अहेरी तालुक्यात येत असलेल्या काफेवंचा या गावालगत असलेल्या जंगल परीसरात वनकर्मचारी रस्त्याचे मोजमाप करीत असताना अचानक नक्षल घटनास्थळी दाखल होवून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह सहा वनकर्मचाऱ्याला बेदम मारहाण करीत वनकर्मचाऱ्यांच्या दुचाकीला जाळपोळ करून  मोबाईल घेवून धमकावून गेल्याची घटना काल सायंकाळी ४.०० वाजताच्या सुमारास घडली आहे.

सिरोंचा वनविभागात येत असलेल्या कमलापुर वनपरिक्षेत्रातील कोरेपल्ली रोड चे नविन बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सदर रस्त्याचे बांधकाम कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात येणार होते. त्याच कामाची पाहणीसाठी कामलापुर चे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोयर, सर्वेयर गणेश रेपलवार, वनपाल एस. एम. येडलावार, राजू मेडलवार, वनरक्षक प्रमोद तोडासे, हेमंत बोबाटे, राधा मडावी गेले होते याच दरम्यान नक्षल घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यांच्या बांधकामाला विरोध दर्शवून यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह सहा जणांना मारझोड केली असून महिला वनरक्षक यांना फक्त धमकावून चार दुचाकी वाहनाची जाळपोळ करीत वनकर्मचाऱ्यांचे मोबाईल हस्तगत करून वनामध्ये येण्यास वन कर्मचाऱ्याला मज्जाव केले आहे. याशिवाय स्थानिक अतिक्रमणं धारकांवर केलेली करवाई मागे घ्यावी, तसेच नवनिर्माण रस्त्याला विरोध करीत नक्षल जंगलाच्या दिशेने निघुन गेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर झालेल्या घटनेची माहिती उपवनसंरक्षक सिरोंचा यांना दिली आहे. सध्या वनकर्माचाऱ्याला मारहाण केल्याचे वनकर्मचार्यात तसेच दुर्गम भागात नक्षलीची दहशत निर्माण झाली आहे.

या घटने संदर्भातील माहिती ‘लोकस्पर्श न्युज’ ने पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांना विचारणा केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिलेला आहे. मात्र दुचाकी जाळपोळ केल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याचे बोलले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

अखेर वनविभागाने सर्व्हे नंबर 21, 100 वर मिळविला ताबा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.