Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर वनविभागाने सर्व्हे नंबर 21, 100 वर मिळविला ताबा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 
  • आरोपींमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे विधी सल्लागार हरीश बांबोळे यांचे नाव.
  • गडचिरोलीत भुखंड माफीयांनी कोटयावधी रुपये कमविण्यासाठी वनजमीनीवरच पाडले भुखंड.
  • आठ महिण्याआधी  प्रकरण उघडकीस येऊनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केला विलंब ?

गडचिरोली: दि. 5 जानेवारी : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या आय.टी.आय. चौकातुन बायपास रोड कडे जाणाऱ्या कक्ष क्रमांक 170 चे सर्व्हे क्रमांक 21 व सर्व्हे क्रमांक 100 येथील संरक्षीत वनात अनाधिकृत भुमाफीयांनी भुखंड तयार करुन अतिक्रमण करुन राजरोशपणे गेल्या आठ महिण्यापासुन सदर जागेत 34 भुखंड पाडुन सिमेंटचे पोल रितसर जमीनीत गाडुन भुखंड टाकले होते आणि त्यातील काही भुखंड हि विक्री केल्याची सुत्राकडुन माहिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र या भुखंडावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती असुनही तब्बल आठ महिने दुर्लक्षीत केल्याने भुमाफीयाचे मनसुबे पुर्णपणे साफ होतांना दिसत होते मात्र या मध्ये प्रसार माध्यमांनी प्रकरण उचलुन धरल्याने वनप्रशासन हतबल होऊन शेवटी आज 5 जानेवारी रोजी वनविभागाच्या संपुर्ण कर्मचाऱ्याच्या समवेत फौज फाटा, जे.सी.बी., ट्रॅक्टर इत्यादीचा वापर करुन अतिक्रमण हटविण्यात आले.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भुमाफीया अदयापही मोकाटच ; दोषी अधिकाऱ्यावर होणार कारवाई?

शहराच्या मध्यभागी असलेल्या परिसरात कोटयावधीच्या वनजमीनीवर लेआऊ टाकुन विक्री करण्यासाठी प्रयत्न करीत असतांना सदर कार्यक्षेत्रातील वनाधिकारी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. तब्बल चार आरोपीवर गन्हयाची नोंद होऊनही आठ महिण्यापासुन प्रकरणाला चाल ढकल करीत असल्याचे चौकशीच्या अहवालावरुन दिसुन येत आहे.

सदर जागा वनविभागाच्या निरिक्षकांनी हि जमीन वनविभागाची असल्याचा अहवालही सादर केल्यानंतरही गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोलीचे तहसिलदार जेव्हा पर्यंत सदर भुखंड महसुल विभागाचे नाही ते वनविभागाचेच आहे असे जेव्हा पर्यंत लेखी उत्तर मिळणार नाही तो पर्यंत मी कुठल्याच कारवाई संदर्भात बोलता येणार नाही असे म्हणत मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कोटयावधीची जमीन असुन भुमाफीयाची नजर या जागेवर लागली असुन भुमाफीया यासाठी राजकीय प्रतीनिधींना भेट घेऊन प्रकरणाला वेगळे वळण देऊन सदर भुखंड लाटण्याचा प्रयत्न चालु असल्याचे सुत्राकडुन खात्रीदायक वृत्त प्राप्त झाले आहे.

तर दुसरीकडे गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोलीच्या तहसिलदाराचा हवाला देऊन प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? की यामध्ये भुमाफीयाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नागरिकांमध्ये खमंग चर्चा होत आहे. तर दुसरीकडे याच भुखंडासंदर्भात उप वनसरंक्षक, सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली यांनी वेळोवेळी कागदोपत्री लेखी सुचना देऊनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांने तब्बल आठ महिने विलंब केले असल्याने संशयासह भुमाफीयाशी साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थीत केल्याने खमंग चर्चेला उधान आले आहे.

तर माध्यमाचा वाढता दबाव निर्माण होताच वरिष्ठांकडुन सदर चौकशी अधिकाऱ्याची कान उघाडणी केल्याने आज दिनांक 5 जानेवारी रोजी फौज फाटयासह कारवाई करुन अतिक्रमण काढले असेल तरी वरीष्ठ अधिकारी संबंधीत दोषी अधिकऱ्यांवर कारवाई करतील का? हाच प्रश्न नागरिकांत अनुत्तीर्ण आहे.

भूखंडात चार आरोपींवर वन गुन्हा दाखल

सर्व्हे नंबर 21 आणि 100 यावर भुमाफीयांनी भुखंड विक्री केल्याचे स्पष्ट होताच वनअधिकाऱ्यांनी सदर जागेची मोका पाहणी करुन वनसर्व्हेक्षक मार्फत सिमा निश्चिती करुन वनगुन्हा क्रमांक 07630/190745/2022 नोंदवुन आरोपी 1) मनीष सुरेश कन्नमवार 2) रुपशे देविदास सोनटक्के 3) गजेंद्र जनार्धन डोमळे 4) हरिश रेवनाथ बांबोळे 5) नरेंद्र जनार्धन डोमळे यांच्यावर वनगुन्हा नोंद आहे.

गडचिरोली वनविभागांनी केले  प्रसिध्दीपत्रक जाहीर 

सर्व्हे नंबर 21 आणि 100 वनजमीन ही अरुण मधुकर गुरनूले यांचे वडील मधुकर जनु गुरनूले (सध्या हयात नाहीत) यांनी उपजिवीके करीता अतिक्रमण केले होते परंतु अरुण मधुकर गुरनूले यांनी मनीष सुरेश कन्नमवार यांच्या साथीने सदर जमीनीचे विक्री करण्याच्या उददेशाने भुखंड तयार करुन विक्री करण्याचा प्रयत्न होता.

सदर प्रकरणात उपरोक्त सर्व संशयीतांना नोटीस बजावुन त्यांचेकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे सादर करुन त्यांचे म्हणने मांडण्याची संधी देण्यात आली. संशयीतांनी वनविभागाकडे सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे त्यांचे मालकी हक्क सदर जमीनीवर सिध्द झाले नाही. करीता सहाय्यक वनसंरक्षक यांच्या आदेशांन्वये सर्व्हे क्रमांक 21 व 100 मध्ये भुखंड टाकण्याकरीता अतिक्रमण केलेले क्षेत्र 1.29 हे. आर. आज दिनांक 05.01.2023 रोजी अतिक्रमण काढुन रोवन्यात आलेले पिल्लर्स व लोखंडी जाळी जप्त करण्यात आली असुन प्रकरण न्यायालयात दाखल करण्याची प्रक्रीया पुर्ण करुन न्यायालयात दाखल करण्यात येईल.

सर्व्हे क्रमांक 21 व 100 मधील अतिक्रमण काढण्याकरीता श्रीकांत नवघरे, क्षेत्रसहाय्यक, गडचिरोली,  भारत राठोड, वनरक्षक, गडचिरोली तसेच गडचिरोली वनपरिक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय कर्मचारी, वनपरिक्षेत्र कुनघाडा व पोटेगांव येथील क्षेत्रीय कर्मचारी यांनी योगदान देऊन आपले कर्तव्य बजावले.

या दरम्यान डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक, गडचिरोली वनविभागातर्फे आव्हान केले आहे की, भुखंड विकत घेत असतांना कागदपत्राची योग्यरित्या तपासणी करुनच खरेदी करावे.

मिलिश दत्त शर्मा, उप वनसंरक्षक, गडचिरोली यांनी सर्व्हे क्रमांक 21 व 100 अतिक्रमणीत क्षेत्रात कुनाचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले असल्यास वनविभागाशी संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.

हे देखील वाचा : 

उपविभाग भामरागड अंतर्गत मन्नेराजाराम येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना

‘विश्व मराठी संमेलन 2023’ चे थाटात उद्घाटन

 

Comments are closed.