Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा –  मंत्री चंद्रकांत पाटील

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

मुंबई, दि.६ जानेवारी : शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे या क्षेत्राचे यश आहे. बदलत्या काळानुसार जीवन सुखकर आणि जागतिक पातळीवर ओळख निर्माण होईल, अशा संशोधनावर भर देण्याचे निर्देश देतानाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने आवश्यक शैक्षणिक सुधारणा कराव्यात, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आज सिडनहॅम महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे बळकटीकरण आणि विविध समस्यांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव भगवान जोशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या बळकटीकरणासाठी प्रादेशिक केंद्र आणि उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठातील पदभरती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भविष्यातील शैक्षणिक गरजा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

नक्षल्यांनी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यासह सहा वनकर्मचाऱ्याला मारहाण करीत दुचाकीची केली जाळपोळ

अखेर वनविभागाने सर्व्हे नंबर 21, 100 वर मिळविला ताबा

 

Comments are closed.