Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आणि सलोनीने पूर्ण केलं दिवंगत वडीलांचे स्वप्न… सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

पालघर, दि. १८ जानेवारी: पालघर जिल्ह्यातल्या नावझे गावातील एका कन्येने अथक परिश्रम करून, आपल्या दिवंगत वडीलांचे स्वप्न पूर्ण केलं आहे. सलोनी उमाकांत सोगले असे या ‘डॉक्टर’ मुलीचे नाव आहे. सलोनीने मिळवलेल्या यशाने आणि तिच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या तिची आई वृषाली उमाकांत सोगले आणि सोगले कुटुंबीयांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

उमाकांत सोगले यांची १५ वर्षा पूर्वी गावातीलच काही समाजकंटकांनी घातपात करून अमानुषपणे हत्या केली होती. बालपणात वडीलांचे छत्र हरपले आणि सुरू झाला सलोनी, तिचा छोटा भाऊ आणि आईच्या संघर्षाचा खडतर प्रवास. या काळात सलोनीला तीचे काका व सोगले कुटुंबीय तसेच, मामाकडील मंडळींनी खंबीर पाठिंबा दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लहानपणी सलोनीला तिचे वडील “तुला मोठं झाल्यावर डॉक्टर व्हायचे आहे आणि जनसामान्यांची सेवा करायची आहे” असे नेहमी सांगायचे ते सलोनीच्या कायमच लक्षात होते. त्यामुळे आपल्या दिवंगत वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे धेय्य तिने उराशी बाळगले होते. त्याचवेळी तिच्या कर्तव्यदक्ष आईनेही आपल्या लहानशा घरात शाळकरी मुलांचे क्लासेस घेत आपल्या मुलांनाही चांगले शीक्षण दिले. वडीलांच्या स्वप्नासाठी सर्व हौस मौजमजा, इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून फक्त डॉक्टर बनायचे हे एकच धेय्य डोळ्यासमोर ठेवून मायलेकींनी अथक प्रयत्न सुरु ठेवले. सलोनीने पुण्यातल्या अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालयात भरघोस गुण मिळवून बी ए एम एसची पदवी प्राप्त केली आणि डॉक्टर बनून आपल्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं.

हि प्रेरणादायी गोष्ट आहे ध्येयपूर्तीसाठी झटणाऱ्या मायलेकींची, स्वर्गीय उमाकांत नरेश सोगले यांच्या पत्नी वृषाली उमाकांत सोगले यांच्या त्यागाची आणि कन्या सलोनी उमाकांत सोगले हिच्या जिद्दीची. सलोनी पार्ट टाईम नोकरी करून डॉक्टर झाली हे बघून आपल्या दिवंगत वडीलांनाही आपल्या लाडक्या मुलींचा व आपल्या जिद्दी पत्नीचा हेवा वाटला असेल. समाजात जेव्हा जेव्हा असे कठीण प्रसंग येतील अशावेळी सलोनीची गोष्ट नक्कीच प्रेरणादयी ठरेल यात शंका नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

ऐश्वर्या रॉयने नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील जमिनीचा २२ हजारांचा कर थकवला

नाशिकच्या अंबड भागात मुलीचे प्रेम संबंध मान्य नसल्याने बापाने पोटच्या पोरीचा खून

 

 

Comments are closed.