Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोमनाथजी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा…

प्रत्येकाला कुटुंब वाटणारा जगावेगळा दिलदार माणूस म्हणजे सोमनाथजी सर्वगोड.

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुंबई दूरदर्शनमध्ये कार्य करणारे व प्रत्येकाशी खऱ्या अर्थाने आपल्या आडनावा सारखे “सर्वगोड” वागणारे दिलदार व्यक्तिमत्व,प्रत्येकाला साथ देणारे व सदा हसतमुख असणारे आमचे कुटुंबीय म्हणजे सोमनाथजी सर्वगोड…
आभाळउंची लाभलेला हा माणूस नेहमीच जमिनीवर असल्याची प्रचिती देतो.. सोमनाथजी आपल्याबद्दल लिहण्यासाठी शब्द नाहीत…वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….

 

एक कविता आपल्यासाठी

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हक्काचा हा माणूस आमचा ‘सोमनाथजी’ आहे,
साथ देण्या प्रत्येकाला,जो सदैव तत्पर राहे,
कामासाठी कधीही ज्याने नकार दिला नाही,
प्रत्येक क्षणाला आयुष्याच्या ‘सर्वगोड’ (सर्वांशी) जो राही !!!
वेलीवरचे फूल सुगंधी ‘सृष्टी’ होऊन आली,
शाहू फुले अन शिवरायांची विचारसरणी झाली,
खरी प्रेरणा ‘ चैत्यभूमी’ जी डोळ्यामधुनी पाही,
प्रत्येक क्षणाला आयुष्याच्या ‘सर्वगोड’ जो राही !!!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

साथ लाभली सात जन्माची “सोमनाथला- सुप्रियाची’,
नाते जुळले जगावेगळे,वाट असे ही आनंदाची,
लाखामध्ये जोडी शोभे जी, सदा हसतमुख राही,
प्रत्येक क्षणाला आयुष्याच्या ‘सर्वगोड’ (सर्वांशी) जो राही !!!
जगावेगळा स्वामीमान जो जन्मताच हो शिकला,
मानाचा हा मुजरा त्यांना जो कुणापुढे ना झुकला,
खरा सोबती होऊन जो साथ सर्वाना देई,
प्रत्येक क्षणाला आयुष्याच्या ‘सर्वगोड’ (सर्वांशी) जो राही !!

 

शब्द रचना, विशाल बोरे,

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.