Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वातंत्र्यचा अमृत महोत्सवानिमित्त सीआरपीएफ बटालियन तर्फे भव्य रॅली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 14 ऑगस्ट 2023 : देशाची सामाजिक, सांस्कृतिक, राजनीतिक आणि आर्थिक ओळख म्हणजे प्रगतशील भारत आहे. याच निमित्ताने देशातील स्वतंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याने प्राणहीता कॅम्प अहेरी स्थित केंद्रीय रिझर्व पोलीस बल 9 व 37 बटालियन द्वारे दुचाकी व चारचाकीच्या माध्यमातून स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव कॅप्टन एम एच खोब्रागडे यांच्या नेतृत्वात रॅली काढून करण्यात आला.

सदर रॅली प्राणहिता कॅम्प येथून आलापल्ली व अहेरी येथील बायपास रोड, दानशूर चौक, गांधी चौकातून परत प्राणहीता कॅम्पमध्ये विसर्जित करण्यात आली. यावेळी पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दुचाकी व चार चाकीवर भारतीय ध्वज लावून देशातील घर घर तिरंगा उपक्रम उत्तमरीत्या राबविण्यात आला. कमांडंट एम एच खोब्रागडे व इतर अधिकारी यांच्या नेतृत्वात रॅलीचे आयोजन शांततेत पार पडले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.