Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निःशुल्क प्रवेश ! भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम निसर्ग उद्यानात मिळणार या दिवशी आनंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वनविकास महामंडळाच्या चंद्रपूर वनप्रकल्प विभाग अंतर्गत असलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यान, बल्लारपूर रोड, चंद्रपूर दि,२३.०८.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता कोनशिला अनावरण सोहळा व अमृत रोपवाटिका (वृक्षारोपन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..
सदर कार्यक्रम मा. ना. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, म. रा. तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर दि २१ ऑगस्ट :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत बुधवार दि.२३.०८.२०१३ रोजी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यान, बल्लारपूर रोड, चंद्रपूर येथे कोनशिला अनावरण सोहळा व अमृत रोपवाटिका (वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे “मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर जिल्हा परिषद, चंद्रपूर व चंद्रपूर शहर महानगर पालिका, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३.०८.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता वनविकास महामंडळाच्या चंद्रपूर वनप्रकल्प विभाग अंतर्गत येत असलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यान, बल्लारपूर रोड, चंद्रपूर येथे कोनशिला अनावरण सोहळा व अमृत रोपवाटिका (वृक्षारोपन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. ना. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, म. रा. तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमा निमित्त हौशी पर्यटकांना निःशुल्क प्रवेश दिला जाणार असल्याने निसर्ग उद्यानामध्ये पर्यटकांनी उपस्थित राहून पर्यटकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेण्याचे आवाहन वनविकास महामंडळाच्या चंद्रपूर वनप्रकल्प विभागाने  केला आहे..

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.