Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिथे रुग्णालयातील परिचारिकेलाच उपचाराअभावी जीव गमावावा लागतो, तिथे सामान्यांची काय परिस्थिती असेल..?

डॉक्टर नसल्याने रुग्णालयातील परिचारिकेचाच उपचारा अभावी मृत्यू. चंद्रपूरातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर, 18 ऑगस्ट 2023 : चंद्रपूरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे ऑन ड्युटी असलेल्या एका परिचारिकेचा वेळेवर डॉक्टर उपलब्ध न झाल्याने चक्क उपचाराअभावी मृत्यू झाला आहे.सीमा मेश्राम (३२) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी परिचारिकेचा नाव आहे. या घटनेने जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ परिचारिका संघटनांनी कामबंद आंदोलन सुरू करून जर रुग्णालयात त काम करणाऱ्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना जर वेळेवर उपचार मिळाले नाही तर सामान्य नागरिकांना उपचार कसे देणार असा प्रश्न विचारला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सीमा मेश्राम ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. दिनांक १६ ऑगस्ट रोजी ती प्रसूती वॉर्डमध्ये रात्रपाळीसाठी कामावर असताना तिला अचानक भोवळ आली. तिला तात्काळ अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र त्यावेळी तेथे एकही डॉक्टर कर्तव्यावर हजार नव्हता. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंतही सीमाला उपचार मिळाला नाही. सिमाची प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांनी तिला खासगी डॉक्टरांकडे नेले त्यानंतर शुक्रवारी पुढील उपचारासाठी तिला नागपूरला नेत असताना मृत्यूने तिला वाटेतच गाठले.

रुग्णालयातच नोकरीला असतानाही वेळेवर उपचार न मिळाल्याने परिचारिकेचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने रुग्णालयातील परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असून, रात्रपाळीत वैद्यकीय अधिकारी का उपलब्ध नव्हते ? रुग्णालयातील तज्ञ्ज डॉक्टर कुठे गेले होते ? रात्रभर मृत्यूशी झुंज देणाऱ्या परिचारिकेची साधी तपासणी देखील का झाली नाही ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या घटनेची आरोग्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.