Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा.अशोक नेते यांनी मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली येथे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलना ला भेट.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 18 ऑगस्ट 2023 : गेल्या 10 दिवसापासून वनसंरक्षक ( प्रादेशिक) वन वृत्त कार्यालय गडचिरोली कार्यालय समोर बेमुद्दत ठिय्या आंदोलनच भिक मांगो आंदोलन व भ्रष्ट वनाधिकार्‍या विरोधात आलापल्ली वनपरीक्षेत्रा अधिकारी योगेश शेरेकर Rfo यांना निलंबित करा मग चौकशी करा ? या मागणीसाठी दि.09 ऑगस्ट 2023 पासुन आंदोलन सुरु केले आहे. सलग दहा व्या दिवशी खासदार अशोक नेते यांनी या ठिय्या आंदोलन ला स्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेऊन या संबंधित योग्य ती कार्यवाही केली जाईल. हा प्रकार वरिष्ठ अधिकारी यांच्या बोलून निकाली काढण्याचा माझा प्रयत्न राहील. निश्चितच आपणांला योग्य न्याय मिळेल. असे आंदोलकांना भेटी दरम्यान वक्तव्य केले.

यावेळी वनविभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक रमेश कुमार, शंकर कालूराम ढोलगे.संचालक जनता टाईम्स फाउंडेशन, प्रणय लहूजी खुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, योगाजी कुडवे जिल्हा अध्यक्ष गडचिरोली अखिल भारतीय सरपंच परिषद म.रा.व आंदोलन कर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.