Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कॉंग्रेस पक्ष त्यांच्याच पूर्वजांनी केलेल्या कर्मांचे फळ भोगतोय: भाजपा चां आरोप..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

सध्या पितृपक्ष सुरू आहे. आपल्या पितरांना शांती मिळावी म्हणून पितृ पंधरवड्यात घरोघरी तर्पण, पितरे जेवायला घालणे यासारखे विधी पार पाडले जातात. पितरांना शांती मिळाली नाही, पितृदोष असेल तर प्रगति खुंटते, अनंत समस्या उभ्या राहतात अशी धारणा आहे. पितृदोषाने ग्रस्त लोक विविध तोडगे शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात.

कोंग्रेस पक्षाचे पोस्टर बॉय आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या तीन पिढ्यातील पूर्वजांनी अखंड, अनिर्बंध सत्ता उपभोगताना समाज आणि देशाच्या हिताला बाधक अशी अनेक राष्ट्रीय पातके केली आहेत आणि त्याचे फळ देश आजही काश्मीर प्रश्न, चीनबरोबरचा सीमावाद, सीमावर्ती राज्यांमधील वारंवार डोके वर काढणारा कॉंग्रेसच्या राजवटीत सातत्याने खालावत  गेलेली देशाची आर्थिक व सामाजिक परिस्थिति, अनेक गुणवंतांची उपेक्षा केल्याने झालेला ब्रेन ड्रेन अशा विविध रूपात आजही भोगतो आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समर्थ सरकार आणि राज्यातील मा. श्री देवेंद्र फडणवीस (आणि आता श्री एकनाथ शिंदे देखील) यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकार या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची, नवनवीन कायद्यांची आखणी आणि अंमलबजावणी करण्याचे अथक परिश्रम गेले दशकभार करत आहेत आणि त्याचे फळ म्हणून भारताला जगभर महासत्ता म्हणून तर महाराष्ट्राला भारताच्या प्रगतीचे ढळढळीत उदाहरण म्हणून मान्यता देखील मिळत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुसर्याव बाजूला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्ष मात्र त्यांच्याच पूर्वजांनी केलेल्या कर्मांचे फळ म्हणून झालेल्या त्याच्या राजकीय वाताहतीला सातत्याने तोंड देत टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. याला कॉंग्रेस पक्षाला आणि नेहरू गांधी परिवाराला भोगावा लागत असलेला एक प्रकारचा पितृदोषच म्हणावे लागेल. स्वत: राहुल गांधी यांनी देखील वेळोवेळी वेगवेगळ्या देशव्यापी यात्रांच्या नावाखाली “बेबीज डे आऊट” देखील साजरे केले. परंतु यातील कोणत्याही प्रयत्नांना यश येताना दिसून येत नाही. उलटपक्षी एकेकाळी देशावर एकहाती अनिर्बंध सत्ता मनमानी पद्धतीने गाजवणार्यात आणि आपल्याला विरोध करणार्या. वेगवेगळ्या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना खच्ची करून दिल्लीतून तुघलकी कारभार करणार्या  कॉंग्रेस पक्षाला अधिकाधिक प्रमाणात प्रादेशिक पक्ष आणि कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागत आहे. एकेकाळी ज्यांनी सोनिया गांधींना विरोध करत कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि आपले स्वतंत्र प्रादेशिक पक्ष उभारले अशा महाराष्ट्रात शरद पवार, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यासारख्या आणि ज्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत देशभर आंदोलन करुन राजकारणात पदार्पण करणार्याा अरविंद केजरीवाल संधीसाधू नेत्यांपुढे वारंवार लोटांगण घालण्याची नामुष्की कॉंग्रेसला सहन करावी लागत आहे. असल्याचे भाजपा कडून बोलले जात आहे..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.