Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानाअंतर्गत गडचिरोलीत एक कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ

गडचिरोली देशातील पहिला ‘कोट्यधीश’ वनजिल्हा बनण्याच्या वाटेवर ...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, २२ जुलै : महाराष्ट्राचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीला देशातील सर्वाधिक हरित जिल्हा बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानाअंतर्गत गडचिरोलीत एक कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते झाला. येत्या वर्षभरात ४० लाख झाडे लावण्यात येणार असून पुढील वर्षी हा आकडा ६० लाखांवर जाणार आहे. या संपूर्ण उपक्रमातून ‘कोट्यधीश’ वृक्षसंख्येचा मान मिळवणारा गडचिरोली हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ. मिलिंद नरोटे, रामदास मसराम, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२०१४-१९ दरम्यान यशस्वीरीत्या पार पडलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याचे वनसंतुलन गडचिरोलीमुळेच टिकून आहे. याच अनुभवाच्या जोरावर आता २५ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गडचिरोलीत नर्सरींचा विकास करून वार्षिक वृक्ष लागवड ही कायमस्वरूपी उपक्रम म्हणून उभी केली जात आहे.

या मोहिमेत लॉईड्स व जेएसडब्ल्यू यांसारख्या उद्योग समूहांना प्रत्येकी २५ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यांच्या सहभागाने खासगी क्षेत्राचाही सहभाग वाढणार आहे. रोपांची तांत्रिक पद्धतीने एक वर्ष संगोपन केले जाणार असून वनाच्छादनवाढीचे मासिक, सहामाही व वार्षिक अहवाल घेतले जातील.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिमलगट्टा व देचलीपेठा या दुर्गम भागातील पोलीस ठाण्यांच्या प्रशासकीय इमारतींचे आभासी उद्घाटन करण्यात आले. नक्षल हिंसाग्रस्त भागातील २३ शहीद पोलिसांच्या पाल्यांना पोलीस दलात सामावून घेण्याच्या उपक्रमाअंतर्गत पंकज मेश्राम व मीना हेडो यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २.५१ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. महसूल, कृषी, वन व इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी, वनसेवक व हजारोंच्या संख्येने नागरिक या उपक्रमासाठी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.