Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१२ वर्षांची प्रतीक्षा संपली… जिल्ह्याला मिळणार ५० नव्या दमाचे केंद्रप्रमुख

विभागीय स्पर्धा परीक्षेतून गुणवत्ता यादीत आलेल्या शिक्षकांची होणार निवड.

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली केंद्रप्रमुख पदाची भरती प्रक्रिया अखेर पूर्णत्वास येत असून, प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेतून निवडलेल्या शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी संधी मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५० पदे स्पर्धा परीक्षेतून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी ८ जून सोमवारलाच पार पडली असून लवकरच यादी जाहीर करून समुपदेशनाचे नियुक्ती दिली जाणार आहे.

साधारण १३ ते १६ जिल्हा परिषद शाळांसाठी एक केंद्रप्रमुख पद असते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १०० केंद्रप्रमुख पदे मंजूर आहेत. यात ५० टक्के म्हणजे ५० पदे ही शिक्षकांमधून पदोन्नतीने भरली जातात; तर उर्वरित ५० टक्के म्हणजे ५० पदे ही शिक्षकांमधूनच स्पर्धा परीक्षेतून भरली जातात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या १२ वर्षांपासून ही पदे रिक्त होती. जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रप्रमुख पदे भरणे गरजेचे होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५’ चा निकाल १३ मार्चला जाहीर झाला.

अशी होणार निवड

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गुणवत्तेनुसार ही प्रक्रिया राबवण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव यांनी शासन परिपत्रक जारी केले असून, ११ दिवसांत नियुक्तीची प्रक्रिया पार पाडण्यासंदर्भात संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी सुद्धा पत्र काढून नियुक्ती प्रक्रिया राबविण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेकडे उमेदवारांची गुणवत्ता यादी ५ जून रोजीच प्राप्त झाली असून, ५० पदांच्या अडीच पट म्हणजे १२५ उमेदवारांना कागदपत्र पडताळणीला बोलावले होते कागदपत्र पडताळणी प्रक्रिया ८ जून रोजीच पार पडली असून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व समुपदेशन प्रक्रिया कधी पार पडते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून गुणवत्ता यादीनुसार पहिल्या ५० जणांना केंद्रप्रमुख म्हणून संधी मिळेल.

विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेतून गुणवत्ताधारक तरुण शिक्षकांची केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती होणार असल्याने मागील अनुभवासह ज्ञानाचा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला निश्चितच लाभ होणार असल्याने व प्रशासनात गतिमानता येणार असल्याने जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.