Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काँग्रेस पक्ष करील बंड…तेव्हा उद्धव ठाकरेंचे सरकार पडेल थंड ! केंद्रीय मंत्री- रामदास आठवले

Get real time updates directly on you device, subscribe now.

काँग्रेस पक्ष करील बंड…तेव्हा उद्धव ठाकरेंचे सरकार पडेल थंड…महाराष्ट्रात लवकरच होईल या सरकारमध्ये बिघाडी…सत्तेतून जाणार महाविकास आघाडी’….अशा कवितेतून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचे भाकीत वर्तवले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहमदनगर २९ डिसेंबर :– राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचे भाकीत कवितेतून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले होते . त्यानिमीत्त देशातील विरोधी पक्षांच्या म्हणजे-युपीएच्या अध्यक्ष सध्या सोनिया गांधी यांच्याजागी शरद पवार यांच्या निवडीची मागणी शिवसेनेच्या संजय राऊत यांनी केल्याच्या वृत्ताचे आठवलेंनी कविता करण्याआधी या नियुक्तीच्या चर्चेवर भाष्य केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्यामुळे सोनियांच्या जागी पवारांच्या नियुक्तीची मागणी शिवसेनेने केल्याने राज्यातील महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडून काँग्रेस या सरकारचा पाठिंबा काढून घेऊन हे सरकार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसने गंभीरपणे हा विषय घ्यायला हवा व स्वाभिमान असेल तर वेळोवेळी होत असलेला अपमान पाहून या सरकारचा पाठिंबा काढायला हवा आहे  व ते काढतील’ असा दावाही आठवलेंनी आवर्जून केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.