Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरोंचात रामजन्मभूमी मंदिर निधी समर्पन अभियानाच्या कार्यालयाचे थाटात शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिरोंचा 15 जानेवारी :- अयोध्या येथील श्रीराम प्रभू मंदिर बांधकामासाठी निधी समर्पण अभियानाची आज सिरोंचा येथे सुरवात करन्यात आली. या प्रसंगी जुन्या ग्रामपंचायत भवनानजीक निधी समर्पण कार्यालयाचा थाटात शुभारंभ करण्यात आला. कालेश्वर येथील रवी महाराज यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यालयाची विधिवत सुरवात करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी निधी संकलन अभियान संपूर्ण देशभर राबविली जात आहे. श्री राम मंदिर निर्माण निधी संकलन आणि गृह संपर्क अभियान दोन टप्प्यात राबविली जात असून या अभियानाचा पहिला टप्पा आज 15 जानेवारी पासून सुरु झाला आहे 15 फेब्रुवारी पर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे.

ह्या अभियानाअंतर्गत अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या भव्य व दिव्य अश्या बांधकामासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांकडून निधी संकलन करणार आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला सिरोंचा येथील युवा वर्गासोबत गणमान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.