Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक ! ४५ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार

महिलेवरील सामुहिक बलात्काराच्या घटनेने जिल्हा हादरला.. चार संशयितांना पोलिसांनी अवघ्या चार तासात ठोकल्या बेड्या... नाशिक जिल्ह्यातील वणी येथिल घटना...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक, दि. २८ ऑक्टोंबर:  राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसंदिवस वाढ होतांना दिसत असून दि. २७ ऑक्टोंबर/२०२१  रोजी  बाहेर गावी जाण्यासाठी वणी येथील बसस्थानकावर ४५ वर्षीय महिलेवर चौघां संशयितांनी सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असल्ल्यायाने संपूर्ण जिल्हा हादरला असून चौघा संशयिंतांना वणी पोलिसांनी अवघ्या चार तासात बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागणींसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे सर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट पसरला असून बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ४५ वर्षीय पिडीत महिला एका व्यक्तीसोबत उभी असतांना दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी तिला बळजबरीने ओसाड जमिनीकडे ओढून त्या दोन नराधमांनी पिडीतेवर  अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा आरोपीसोबत दोघे बाहेर असलेल्या   साथिदारांनी देखील तेथे येऊन अत्याचार केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेची माहिती महिलेच्या सोबत असलेल्या व्यक्तीने स्थानिक पोलिसांना दिल्याने पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवित चौघा संशयितांना बेड्या ठोकल्या. यामध्ये चौघांही संशयितांनी गुन्ह्याची कुबुली दिली असून या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ऑनलाइन सट्टावर पोलिसांची धाड! ३०,०९,४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – भाजपा नेते आ. अँड आशिष शेलार

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.