Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – भाजपा नेते आ. अँड आशिष शेलार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, दि. २७ ऑक्टोंबर :  जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी आघाडी कडून आरोप करण्यात आले होते की, या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मग चौकशी अंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तर दिली ?. जलयुक्त शिवार मुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती.

मग या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केलं. हे सिध्द होते. राजकीय व्देषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

अशोक नेते यांच्या “सेवा से समर्पन प्रवास” कार्य अहवाल पुस्तकाचे भाजपा राष्ट्रीय संघटन मंत्री यांचे हस्ते प्रकाशन

Comments are closed.