Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागरीकांच्या शासकीय योजनेत जिल्ह्याला झुकते माफ देणार – राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे

नगरविकास ऊर्जा आदिवासी विकास यांचे प्रतिपादन सालमारा येथे आदिवासी मेळावा संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. २७ ऑक्टोंबर : गडचिरोली जिल्हा हा अति मागसजिल्हा ओळखला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना सिंंचनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणुन जुन्याप्रमाणे मागेल त्याला कृषी पंपाना विज कनेक्शन देऊन व पायाभुत सुविधा देण्यास प्रयत्न करून तसेच गरीब गरजू नागरीकांचे वनहक्क पट्टे वाटपही बेघडकाम करुण आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणुन चांगल्या दर्जाचे शिक्षण देणारं आणी येणाऱ्या काळात दुर्गम भागातील आदिवासीच्या मुलांना बोली भाषेतुन शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
असे प्रतिपादन प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री आदिवासी विकास ऊर्जा व नगरविकास यांनी आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा गट ग्रामपंचायत हद्दीतील सालमारा येथे आदिवासी मेळाव्याच्या कायक्रमातुन उद्घाटन म्हणुन बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मेळाव्याचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम
प्रमुख उपस्थिती माजी केद्रीय राज्यमंत्री तथा संपर्क प्रमुख सुबोध मोहीते माजी खासदार मधुकर कुकडे माजी आमदार हरीराम वरखडे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता प्रविण पाटील कुंटे जिल्हा निरीक्षक श्रीकांत शिवनकर रा.काॅ.पा.जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर प्रदेश संघटक सचिव युनुनभाई शेख महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शाहिन हकीम रा.यु.का.जिल्हा निरीक्षक जगदिश पंचबुध्दे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक वंदनाताई आवळे पंचायत समिती सदस्य वृंदा गजभिये, शाम घाईत, ग्रा.प.सदस्य स्वनिल गरफडे, गुरुदेव कुमरे, देविदास ठाकरे, अश्विनी घोडाम, जोती घुटके, करीष्मा मानकर, प्रतिभा मोहुलै, वैशाली चापले आदि मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पुढे बोलताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांंनी सागीतले की, शेतकऱ्यांना बरेच भागात शासकीय धान खरेदी केंंद्रावर लांंब दुर धान विक्री करण्यास जावे लागते. अशा परिस्थितीत वेळ पैसा वाया जातो. यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फततिने आदिवासी भागात जवळपास धान खरेदी करण्यास प्रयत्न करुन शासन स्तरावरून त्या ठिकाणी गोडाउनची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करु असेही सांगीतले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, प्रवक्ता कृटे, जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांंनीही मार्गदर्शन केले. याप्रसंंगी जोगीसाखरा ग्रामपंचायतीच्या वतीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा जंगी सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा प्रभारी सरपंच संदिप ठाकुर यांनी केले तर सुत्रसंचालन लिलाधर भरडकर यांनी केले असुन आभार प्रदर्शन दिलीप घोडाम यांनी मानले.

यावेळी वेळी शासकीय अधिकारी व तालुक्यातील सर्व सरपंच तथा नागरीक उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी गंंगाधर कुमरे, राहुल वाघ, महेश राऊत, माधव नारनवरे, प्रदिप वाघ, अखिल नारनवरे, संतोष कुमरे, साईनाथ मडावी यासह शेकडो युवकानी काम पाहीले .

हे देखील वाचा :

अशोक नेते यांच्या “सेवा से समर्पन प्रवास” कार्य अहवाल पुस्तकाचे भाजपा राष्ट्रीय संघटन मंत्री यांचे हस्ते प्रकाशन

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – भाजपा नेते आ. अँड आशिष शेलार

Comments are closed.