Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

… त्या तिघींचा ओढ्यात बुडून मृत्यू ! आंघोळीला जाणे बेतले जीवावर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. ५ नोव्हेंबर : मिरज तालुक्यातील टाकळी येथील ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  यात  पारधी समाजातल्या दोन तरुणींसह एक बालिकेचा समावेश आहे.

मिरज तालुक्यातील टाकळी येथील जुना मालगाव रस्त्यावरील मलेवाडी ओढ्यात ही दुर्दैवी घटना घडली असून नंदिनी देवा काळे(१६), मेघा चव्हाण काळे (१८) आणि स्वप्नाली टवळ्या पवार(६) अशी तिघांची नावे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टाकळी येथील आंबेडकर नगर मधील पारधी वस्ती या ठिकाणी या तिन्ही मुली राहतात. दुपारच्या सुमारास या मुली अंघोळीला गेल्या होत्या त्या परत न आल्याने त्यांच्या घरांच्यानी शोध सुरू केला. शोध सुरू असताना ओढ्याच्या काठावर तिघींची चप्पल,कपडे पडल्याचे दिसून आल्याने पाण्यात बुडल्याची शंका आली.

सदर घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना देतात घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत,अथक प्रयत्नानंतर तिघींची मृतदेह शोधून बाहेर काढले. त्यानंतर घटनास्थळी पारधी समाजाच्या महिलांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

केवळ ‘लिव्ह इन’ रेलेशनशिपमध्ये राहिल्याने मिळत नाहीत वैवाहिक अधिकार!

धक्कादायक! दिवाळीदीनी मध्यरात्री युवकाने गळफास लावून केली आत्महत्या!!

नानाभाऊ पटोले यांनी घेतला आरमोरी विधानसभा क्षेत्राचा आढावा

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.