Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नानाभाऊ पटोले यांनी घेतला आरमोरी विधानसभा क्षेत्राचा आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ५ नोव्हेंबर :  महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चे अध्यक्ष व मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या निवासस्थानी स्वदिच्छा भेट देऊन आरमोरी विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला. यात होणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुका पुढे पाहता मोठ्या प्रमाणात पक्ष संघटन मजबूत करण्याची रणनीती आखुन प्रत्येक तालुका स्तरावर बैठका लावण्याचे निर्देशही माजी आमदार आनंदराव गेडाम यांना दिले.

यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या परीवाच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार व गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे सत्कार करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव रवींद्र दरेकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जिवन पाटील नाट कुरखेडा, तालुका काँग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, जिल्हा परिषद सदस्य प्रलाद कराडे, माजी जिल्हा परिषद सभापती आनंदराव आकरे, माजी जिल्हा परिषद सभापती विश्वास भोवते. जेसा मोटवानी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मंगला कोवे. पंचायत समिती सदस्य वृंदा गजभिये पंचायत समिती सदस्य किरण मस्के शहर महिला काँग्रेस अध्यक्ष निर्मला किरमे आरमोरी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष भुपेश कोलते विश्वेश्वर दरो अभय नाकाडे राजु बुले नरेंद्र गजपुरे आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस उज्वला मडावी. राजु घोडाम सरपंच विलास बावणे सत्यवान वाघाडे यासह मोठ्या संख्येनी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

मिस्टर महाराष्ट्र नेक्स्ट स्टार आयकॉन २०२१ स्पर्धेत विजय घोलपे प्रथम

नाशिक येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता!

Comments are closed.