Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिक येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता!

ऐन दिवाळीच्या सणात मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिक दि,०५ नोव्हेंबर :  नाशिकच्या अंबड औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) येथील कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता झाल्याने ऐन दिवाळीच्या सणात कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनकर रामचंद्र विशे (वय २५) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो
दि. २५/१०/२०२१ रोजी रोजी अंबड एमआयडिसी मध्ये वॉटर सप्लाय रिडिंग घेण्यासाठी गेला होता, मात्र आज पर्यंत परत आलेला नाही.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दिनकरच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.मात्र १० दिवसानंतर देखील तपासामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर दिनकरचा शोध घ्यावा अशी विनंती दिनकरचे आई वडील आणि नातेवाईक यांनी पोलिसांना केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मूळचा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातल्या तोंडली गावचा दिनकर विशे, त्याचा चुलतभाऊ मीरज विशे, जयेश भोईर, नितेश शिर्के आणि जिवन पष्टे असे पाच तरुण नोकरी निमित्त नाशिक मधील सातपुर एम आय डी सीच्या महींद्रा सर्कल येथील टाफ कॉलनीत राहतात. दिनकर हा अंबड एमआयडिसी मध्ये वॉटर सप्लाय रिडिंग घेण्याचे काम करत होता. नेहमप्रमाणेच दिनकर दि,२५/१०/२०२१ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाला, परंतु रोज साधारण सायंकाळी ०८ ते ०९ च्या दरम्यान पुन्हा घरी येणारा दिनकर रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या माबाईलवर संपर्क केला असता तो बंद लागला.

त्यामुळे सर्व मित्रांनी त्याचा नाशिक शहर परीसरात रात्रभर शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. दुसऱ्या दिवशी दिनेशचा चुलतभाऊ आणि मित्रांनी दिनांक २६/१०/२०२१ रोजी सकाळी एमआयडिसी उदयोग भवन कार्यालय सातपुर याठिकाणी जाउन दिनकरची डयुटी शिट बघीतली असता दिनांक २५/१०/२०२१ रोजी तो डयुटी शिटवर सही करून अंबड एमआयडिसी मध्ये वॉटर सप्लाय रिडिंग घेण्यासाठी गेल्याचे दिसून आले. शिवाय अंबड एम आय डी सी मधील बी ८१ ईले.अॅप अंबड या कंपनीत चौकशी केली असता तेथिल सेक्युरीटी गार्डने दिनकर कंपनीत रीडिंग घेऊन गेल्याची माहिती दिली. परंतु त्यानंतर  दिनकर कुठे गेला हे याबाबत कोणतीच माहिती मिळत नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अतिशय मेहनती, शांत व सैय्यमी असलेला दिनकर अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी दिनकरच्या बाबतीत गांभीर्याने दखल घेऊन त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी विनंती दिनकरचे आई वडील आणि नातेवाईक यांनी पोलिसांना केली आहे. तसेच दिनकरबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास, किंवा तो
आढळल्यास . गोविंद विशे (काका) 9226478955 , 754777565 या नंबरवर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा,

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भारतीय जवानांसोबत साजरी केली दिवाळी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महिला प्रवाशांना भाऊबीज भेट

Comments are closed.