Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भारतीय जवानांसोबत साजरी केली दिवाळी

नौशेराच्या वाघांनी शत्रूला नेहमीच जशास तसे उत्तर दिले : पंतप्रधान मोदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. ४ नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या नौशेरात जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी जवानांना संबोधित केलं. त्यावेळी मोदी म्हणाले की, मी एक कुटुंबातील सदस्य म्हणून आलोय आणि १३० कोटी भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन आलोय. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुमच्याकडून मी एक नवी ऊर्जा घेऊन जाणार आहे. देशाची सेवा करण्याचं सौभाग्य सर्वांना नाही मिळत. तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला असं वाटतंय की, तुम्ही दृढ निश्चयानं भरलेले आहात आणि हा निश्चय आणि पराक्रमाचा आत्मा भारत मातेचं संरक्षण कवच आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा मी नौशेराच्या धरतीवर उतरलो, त्यावेळी मन रोमांचानं भरुन गेलं. ते म्हणाले की, येथील वर्तमान तुमच्यासारख्या वीर जवानांच्या वीरतेचं जीवंत उदाहरण आहे. ते म्हणाले की, नौशेराच्या वाघांनी नेहमीच शत्रुला चोख उत्तर दिलंय. सर्जिकल स्ट्राइकमध्ये नौशेराच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्जिकल स्टाइकनंतर येथे अशांती पसरवण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु, प्रत्येक वेळी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदी आज काश्मीरच्या नौशेरा इंथ दाखल झाले होते. दरम्यान लष्कर प्रमुख एम.एम.नरवणे हेही मोदींसोबत होते.

एक दिवा जवानांसाठी

आज संध्याकाळी दिवाळीनिमित्त एक दिवा वीरता, शौर्य, पराक्रम, त्याग आणि तपस्याच्या नावावर लावा. देशातील प्रत्येक नागरिक जवानांना दिवा लावून जवानांना शुभेच्छा देईल. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करेल, असं मोदी म्हणाले. तुमच्याकडून ऊर्जा, नवी उमेद आणि नवा विश्वास घेण्यासाठी मी आज पुन्हा आलो आहे. मी केवळ एकटाच तुमच्याकडे आलो नाही. तर १३०  कोटी देशवासियांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या काळात येथील ब्रिगेडने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यावर देशाला आजही अभिमान वाटतो, असंही त्यांनी सांगितलं.

हे देखील वाचा :

डिझेल १० रुपयांनी तर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

तब्बल १३ लाख किंमतीचा मुद्देमाल केला लंपास ! दिवाळी आधी गिफ्टच्या दुकानात चोरी !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महिला प्रवाशांना भाऊबीज भेट

 

 

 

Comments are closed.