Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डिझेल १० रुपयांनी तर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

अखेर पोटनिवडणुकांत दणका बसल्याने मोदी सरकारला आली जाग!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, दि. ३ नोव्हेंबर : देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे निवडणुकीत यश प्राप्त करता आले नसून चांगलीच चपराक बसल्याने धास्ती घेत  चक्क पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याने जाग आल्याचे चित्र निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते.

त्यामुळे पेट्रोलमध्ये पाच रुपयांनी आणि डिझेलमध्ये दहा रुपयांची घट होण्याची चिन्हे आहेत. या निवडणूक निकालाच्या धास्तीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे दर कमी झाले तरी पेट्रोल शंभरच्या वरच राहणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे पुणे शहरात पेट्रोल आता ११५.५२ रुपयांवरून ११० रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेल हे १०४.६७ पैशांवरून पुन्हा शंभर रुपयांच्या आत म्हणजे ९४ रुपये प्रति लिटरने मिळेल. हे दर तीन नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

देशभरातील झालेल्या विविध राज्यांतील पोटनिवडणुकांच्या कालच्या निकालात भाजपला चांगलाच दणका बसल्याने हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या पराभवाचे खापर महागाईवर फोडले. त्यातही विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या वाढते दर आणि महागाईमुळे निवडणुकीत पराभव झाल्याचे म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या समोर उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका बसण्याचा धोका लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात पेट्रोल-डिझेलवरील दर कमी झाल्याने थोड्या प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

हे देखील वाचा :

तब्बल १३ लाख किंमतीचा मुद्देमाल केला लंपास ! दिवाळी आधी गिफ्टच्या दुकानात चोरी !

‘जय भीम’ चित्रपटातील दृश्यावरुन वाद

कोल्हापुरात लाखो रुपयांचा दीड हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

Comments are closed.