Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महिला प्रवाशांना भाऊबीज भेट

मुंबईतील महिलांसाठी येत्या ६ नोव्हेंबरपासून ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ ६ नोव्हेंबरपासून १०० बसगाड्या धावणार

लोकस्पर्श न्यून नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ३ नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी मुंबईतील महिलांसाठी येत्या ६ नोव्हेंबरपासून ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ ६ नोव्हेंबरपासून १०० बसगाड्या  सुरु करण्याचे आदेश बेस्ट उपक्रमाला दिले आहेत.  यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे या बसेसमध्ये ९० बसेस वातानुकूलित असणार आहेत. त्यामुळे दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्याकडून  महिलामंडळींना खास भाऊबीज भेटच दिली जात असल्याची चर्चा आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बेस्टद्वारे २७ बस आगारातून मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील १०० बस मार्गावर ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ बस सेवा सुरु करण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाने महिलांसाठी काही कालावधीपूर्वी सुरू केलेली तेजस्विनी बससेवा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बंद पडली होती. सध्या या तेजस्विनीमधून महिलांसह पुरुष मंडळीही प्रवास करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईकरांसाठी रेल्वेनंतर दुसरी ‘लाईफ लाईन’ म्हणून बेस्ट बस सेवेला प्रवासी पसंती देतात. बेस्ट बसेसने दररोज ३० लाख प्रवासी प्रवास करतात. यात महिला नोकरदार प्रवाशांची संख्या मोठी आहे. बेस्ट बसेसमध्ये महिला प्रवाशांना प्रथम प्राधान्य देण्यात येत असून त्यांच्यासाठी काही आसने आरक्षित ठेवण्यात आली आहेत.

सध्या शहरातील विविध मार्गावर बेस्टच्या ३७ महिला स्पेशल बस धावतात. त्यात या १०० बसची भर पडल्यामुळे एकूण महिला स्पेशल बसची संख्या १३७ होणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे देखील वाचा  :

डिझेल १० रुपयांनी तर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

तब्बल १३ लाख किंमतीचा मुद्देमाल केला लंपास ! दिवाळी आधी गिफ्टच्या दुकानात चोरी !

‘जय भीम’ चित्रपटातील दृश्यावरुन वाद

 

Comments are closed.