Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या बंदोबस्तासाठी संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा वनपरीक्षेत्र कार्यालयावर धडकला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि, १५ में :- आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथील एका शेतकऱ्यांच्या पत्नीला  व आरमोरी येथील एका शेतकऱ्याला नरभक्षक वाघाने हल्ला करून दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी दोघाना ठार केल्याने भारतीय किसान सभा, रयत शेतकरी संघटना च्या नेतृत्वात संतप्त होवून शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आरमोरी वनपरीक्षेत्र कार्यालयावर काढण्यात आला.

दैनंदिन शेतीचे काम करीत असताना नरभक्षक वाघाने शेतकऱ्यांवर अचानक हल्ला करून ठार केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले  आहे . याशिवाय घरातील परिवाराची सांभाळ करणारे सदस्यच अचानक परिवारातून वाघाच्या हल्ल्यात गेल्याने मृतकाच्या परिवारावर मोठे संकट ओढवले आहे.

त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या परिवारांना 50 लाखाची मदत करून परिवारातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, जंगला लगत असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक एकरी तीस हजार रुपये देत शेतीला ताराचे कुंपण करण्यासाठी तार देण्यात यावे, जंगलातील गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, वाघाचा वास्तव असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना व जंगलामधील गावातील युवकांना शहरात रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे.

यासाठी सर्व मागण्याघेऊन  आखील भारतीय किसान सभाचे जिल्हाध्यक्ष अमोल मारकवार ,रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
आरमोरी बर्डी टी पॉईंट ते शहराच्या मुख्य मार्गावरून रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांचा मोर्चा काढून वनविभाग कार्यालयावर धडकला.

आरमोरी वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाने गेल्या काही दिवसापासून  परिसरातील शेतकरी, शेतमजूरावर हल्ले करून बळी घेतला आहे. दि, 13 मे ला नलुबाई जागळे ही महिला आपल्या शेतात काम करीत असताना सदर नरभक्षक वाघाने तिचा बळी घेतला तर दुसऱ्या दिवशी दि, 14 मे ला आरमोरी येथील शेतकरी नंदू गोपाळा मेश्राम हा कोसा विकास जवळ शेतात काम करीत असताना त्याचाही नरभक्षक वाघाने बळी घेतलेला आहे.

यामुळे वाघाचे माणसावर होणारे हल्ले अत्यंत घातक असल्याने  आरमोरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झालेली आहे. शेतकऱ्याला  आपल्या शेतात जाऊन काम करणे ही अवघड झालेले आहे. अशातच शेतकऱ्यांला मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीचे कामासोबत शेतात उभे पीक आहे .अशा परिस्थितीत वाघाच्या भितीमुळे शेतात न गेल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे .तसेच शेतात गेल्यावर वाघाच्या हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागाच्या समस्या सोडविणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी देसाईगंजचे सहाय्यक वनसंरक्षक धनंजय वायभासे यांना निवेदन दिले.यावेळी आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधीकारी प्राणिल गिल्डा, ठाणेदार मनोज काळबांडे, आरमोरी चे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम सह अन्य अधिकारी  उपस्थित होते.

याप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक वायभासे यांनी सांगितले की,शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाच्या वतीने १०-१० कर्मचाऱ्यांच्या तुकड्या जंगला लगतच्या भागात तैनात केलेल्या आहेत. ह्या कर्मचाऱ्यांच्या तुकड्या सकाळी ५ वाजतापासून ते रात्रौ ९ वाजे पर्यंत राहणार आहेत.सकाळी ९ वाजता नंतरच शेतकऱ्यांनी शेतात जाऊन सायंकाळी ५.०० वाजता परत यावें. तसेच सदर नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शार्पशूटरची नऊ जणांची टीम आरमोरीत दाखल झाली असून येत्या ४ ते ५ दिवसात  त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

या मोर्चात भारतीय किसान सघाचे अमोल मारकवार , रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम, रामदास जराते राष्ट्रवादीचे संदीप ठाकूर,वृक्षवल्ली संस्थेचे देवानंद दुमाणे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र शेंडे, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे प्रहार संघटनेचे निखील धार्मिक,मनसेचे रणजित बनकर,बापू तिजारे ,युवारंगचे राहुल जुवारे, प्रफुल खापरे ,ओमप्रकाश गोंधळे, सुरज पडोळे, यादव प्रधान, गजानन तलमले ,तुकाराम भोयर ,बळीराम भोयर ,सुरेश मेश्राम, शेषराव कुमरे, हिरामण शिलार ,विनायक तुपत, दिवाकर गराडे ,सुनील ठाकरे , सुरेश मेश्राम, आसाराम प्रधान ,बंडू मेश्राम ,तुकाराम मेश्राम, यादव प्रधान, रमेश मेश्राम, रुपेश मेश्राम ,गणेश प्रधान ,राजू ठाकरे,सु रेश तिवाडे, मोरेश्‍वर डुकरे गोपाल दिघोरे , सुनिल कुमरे अशोक दिघोरे, यासह  शेकडो नागरिक व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. तर कुठे अनुचित प्रकार घडू नये  यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवन्यात आला होता.

हे देखील वाचा,

नक्षल ने केली एका इसमाची हत्या !

Comments are closed.