Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलनी केली नवनिर्माण रस्त्याच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दी,16 में :-  एटापल्ली तालुक्यात येत असलेल्या हालेवारा पोलीस मदत केंद्र अंतर्गत  नवनिर्माण  करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना उघड़किस आली आहे..

Lwe डावी कड़वी  विचारसरणी अंतर्गत मौजा मवेली ते मोहुर्ली  या  नवनिर्माण करण्यात येणाऱ्या रसत्याचे बांधकाम (Vcpl) वल्लभभानी कॉन्ट्रक्शन प्रायवेट लिमिटेड यांचे मार्फत काम केले जात होते. मात्र अचानक मध्यरात्रीच्या वेळी नक्षल बांधकाम स्थळी दाखल होवून स्थानिक कर्मचाऱ्याला झोपेतून उठविले त्यानंतर  काही कडायच्या आत नक्षलनी उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करीत वाहनांची जाळपोळ केल्याची घटना सूत्राकडून मिळाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या जाळपोळीत दोन पोकलेन ,एक ट्रैक्टर एक ग्रेडर, एक ट्रक चा समावेश असून अंदाजीत अडीच कोटीचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.जाळपोळ या घटनेची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच घटनास्थळ गाठून अधिक तपास करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे .पोलिसांच्या तपासानंतर नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे तपासातून निष्पन्न होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

झालेल्या घटनेसंदर्भात लोकस्पर्श न्यूज नेटवर्क च्या प्रतिनिधीने पोलीस विभागाला विचारणा केली असता घटनेला दुजोरा दिलेला आहे. मात्र तपासाशिवाय बोलता येणार नसल्याने  पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे .

नक्षलनी  दोन दिवसांपूर्वी  याच हालेवार पोलिस मदत केंद्रातील एका इसमाची हत्या केल्यानतर दुसरी घटना घडवून आनल्याने  नक्षलग्रस्त ग्रामीण भागात नागरिकात दहशत निर्माण झाली आहे .

है देखील वाचा,

नक्षल ने केली एका इसमाची हत्या !

 

Comments are closed.