Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनैतिक संबंधातून प्रियकराने केला प्रियसीच्या पतीचा खून…

बुलढाण्याच्या लोणार तालुक्यतील सारस्वत गावातील घटना..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि. ६ मार्च : अनैतिक संबंधातून प्रियसीच्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात उघडकीस आली आहे.

लोणार तालुक्यातील सारस्वत गावातील एका विवाहितेचे त्याच गावात राहणाऱ्या श्याम दूधमोगरे नामक युवकाशी सूत जुळले होते, मात्र या प्रेमाला या विवाहितेच्या पतीकडून विरोध होत असल्याच्या कारणामुळे श्याम दूधमोगरे नामक या प्रियकराने तिच्या पतीचा काटा काढला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सारस्वत गावातील शेत शिवारात पती कैलास इंगोले यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता, त्यानंतर घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी गावात चौकशी केली असता कैलास इंगोले याच्या पत्नीचे गावातीलच आरोपी श्याम दुधमोगरेशी अनैतिक प्रेम संबंध असल्याचे समोर आले, त्या अनुषंगाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याने कैलास इंगोले चा खून केल्याची कबुली दिली आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटनेची सभा पडली पार..

चक्क, त्या तीन बहिणींनी नवराच केला एकमेकांत शेयर..

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.