Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे, दि.६ मार्च :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे करण्यात आले. या पुतळ्याची उंची सुमारे ९.५ फूट इतकी आहे.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, खासदार छ्त्रपती उदयनराजे भोसले, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

चक्क, त्या तीन बहिणींनी नवराच केला एकमेकांत शेयर..

“मेट्रोच्या अर्धवट कामाच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणा” शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला मिळाले उपयोगी वाहन

Comments are closed.