Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेल्वे गाडीतून दोन कोटी चे दागिने जप्त; रेल्वे पोलिसांची धडाकेबाज कारवाई

चेन्नई येथून मिळालेल्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंग व फोटोच्या आधारे बिहार राज्यातील रहिवासी असलेल्या चार चोरट्यांना बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी केली अटक..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. ५ मार्च : बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत तामिळनाडूच्या त्रिपुर येथील सराफाकडून लुटलेले ३ किलो सोने व ३० किलो चांदीसह साडे १४ लाखांची रक्कम रेल्वेगाडीतून जप्त केली आहे.

चेन्नई येथून बागमती एक्सप्रेसने हे ४ चोरटे निघाले होते. रेल्वे सुरक्षा दलाच्या अंतर्गत गोपनीय माहितीनुसार बल्लारपूर रेल्वे स्थानकावर यासाठी मोठी शोधमोहीम राबवण्यात आली. चेन्नई येथून मिळालेल्या  सीसीटीव्ही रेकॉर्डिंग व फोटोच्या आधारे बिहार राज्यातील रहिवासी असलेल्या चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे बल्लारपूर रेल्वे पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार त्रिपुरा ते चेन्नई’ च्या दिशेने जाणारी गाडी क्रमांक- १२५७८ बागमती एक्स्प्रेस मध्ये चार युवक सोने, चांदीचे दागिने नेत असल्याची खात्रीलायक माहिती वरिष्ठांकडून बल्लारशहा आरपीएफ विभागाला मिळाली. या गुप्त माहीतीच्या आधारे हि रेल्वे गाडी बल्लारशहा स्थानकावर आली असता गाडीची तपासणी करण्यात आली.

या तपासणीत चोरट्यांकडून त्यांच्याकडील बॅग व गोणी जप्त केली असता नवीन व जुने कपडे तीन काळ्या रंगाच्या पिशव्या व निळ्या रंगाची एक छोटी पिशवी, हिरव्या रंगाची मोठी पिशवी व निळ्या रंगाच्या गोणीमध्ये सोने, चांदी व सोन्याचे कपडे आढळून आले. भरलेले आढळून आले, वरील दोन्ही पिशव्यांमधील माल रिकामा करून गोनी, सोने, चांदी व पैसे वेगळे केले, त्या पिशवीत सापडलेले सोने, चांदी व पैसे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून त्यांचे वजन करून ते मोकळे केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यामध्ये ३३०६.७१० ग्रॅम सोने, अंदाजे किंमत १,७६,५७,८३१.४० रुपये, २७.९७२ किलो चांदीची अंदाजे किमंत १,९५,८०४० रुपये आणि १४,५२,१०० रुपये/रोख सापडली आहे. अशा प्रकारे एकूण मुद्देमालाची किंमत २,१०,६७,९७१.४/- इतकी आहे.

रेल्वे पोलिसांनी पंचनामा करीत सदर दागिने आणि रोख रक्कम ताब्यात घेतले. या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्याची नावे महताब आलम (३७) बगडहारा जि. अररिया, बिहार, बदरुल (२०) गमडीया जि. अररिया, बिहार, मोहम्मद सुभान (३०) जुनीजी जि. अररिया, बिहार, दिलकश (२०) गमडीया, जि. अररिया, बिहार असे आहेत.

सदर कारवाही आरपीएफ निरीक्षक नवीन प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रवीण महाजन, उपनिरीक्षक प्रवीण गाडवे, सहायक उपनिरीक्षक डी. गौतम, उपनिरीक्षक राम लखन, प्रिन्सिपल कॉन्स्टेबल राम वीर सिंग, प्रिन्सिपल कॉन्स्टेबल डी. एच. डबल, प्र. कॉन्स्टेबल जितेंदर पाटील, हवालदार पवनकुमार, हवालदार शिवाजी कन्नोजिया, हवालदार देशराज मीना, आर. मोहम्मद अन्सारी, आर हरेंद्र कुमार, आर रुपेश यांच्या वतीने करण्यात आली.

घटनेत जप्त साहित्य व आरोपींना तामिळनाडू पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याची माहिती आरपीएफ निरीक्षक नवीन प्रताप सिंह यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला मिळाले उपयोगी वाहन

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टांगसुडो स्पर्धेत कु. भार्गवी कांबळे हिने पटकाविला प्रथम क्रमांक

आकाश पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी..

 

Comments are closed.